Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोहारे-कासारे पाझर तलावातील पाणी रब्बी हंगामासाठी ‘संजीवनी’; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते जलपूजन
पाण्याचे राजकारण

लोहारे-कासारे पाझर तलावातील पाणी रब्बी हंगामासाठी ‘संजीवनी’; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते जलपूजन

लोहारे-कासारे आणि मेंढवण हा परिसर पूर्वीपासूनच दुष्काळाच्या झळा सोसत आला आहे. अनेक पिढ्यांनी येथे भीषण पाणीटंचाई अनुभवली असून, येथील शेती पूर्णपणे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

निळवंडे डाव्या कालव्याच्या माध्यमातून कासारे येथील पाझर तलावात पाणी सोडण्यात आल्याने या भागातील शेतीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. रविवारी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पाण्याचे विधिवत पूजन करून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. 

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, लोहारे-कासारे आणि मेंढवण हा परिसर पूर्वीपासूनच दुष्काळाच्या झळा सोसत आला आहे. अनेक पिढ्यांनी येथे भीषण पाणीटंचाई अनुभवली असून, येथील शेती पूर्णपणे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून होती. अनेकदा पाझर तलाव कोरडे राहत असल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया जात असत. 

मात्र, आता राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळे या भागाला हक्काचे पाणी मिळाले आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी हे पाणी खऱ्या अर्थाने ‘संजीवनी’ ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लोहारे-कासारे शिवारातील काथ नदीवर लघु पाटबंधारे विभागामार्फत सन १९६६ मध्ये या पाझर तलावाची उभारणी करण्यात आली होती. या तलावाची एकूण साठवण क्षमता ४३.२८ दशलक्ष घनफूट इतकी असूनही, पावसाअभावी ही क्षमता कधीच पूर्णपणे वापरता आली नव्हती. यंदा मात्र या तलावात २९.०३० दशलक्ष घनफूट इतका महत्त्वपूर्ण जलसाठा उपलब्ध झाला आहे. या साठ्यामुळे लोहारे, कासारे आणि मेंढवण या तीन गावांतील तब्बल १७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामुळे या भागात आता पारंपरिक पिकांऐवजी गहू, हरभरा आणि भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेण्याचा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाऱ्यांद्वारे पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या दुरुस्ती कामांचे प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या भागाला कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा मिळवून देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

कार्यकारी अभियंता प्रीतम शेवाळे यांनी यावेळी माहिती दिली की, तलावाची उभारणी होऊन अनेक वर्षे उलटली तरी त्यात नियमित पाणी येत नव्हते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे. भविष्यातही हा प्रकल्प सातत्याने कार्यरत राहील, याकडे विभाग लक्ष देईल. 

या जलपूजन सोहळ्याला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कवडे, दिलीप पोकळे, अण्णासाहेब सोमवंशी, दत्तू पोकळे, विजय पोकळे, नवनाथ कानकाटे, रमेश कानकाटे, घनश्याम भास्कर, दीपक कदम, बाळासाहेब पोकळे, शिवाजी पोकळे, वाल्मीक पोकळे, गोरख पोकळे, शुभम पोकळे, सुधीर पोकळे, विजय दिघे, मोहन पोकळे, चंदू कारले, सागर कारले, दिलीप गायकवाड, नाना कारले, बाळासाहेब कारले, यमनाथ कारले, रघु कारले, रामनाथ बोऱ्हाडे, मेंढवण येथील शरद यलमामे आणि बाळासाहेब बढे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 989
अमोल खताळ जल पूजन पाणी लोहारे कासारे पाझर तलाव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.