Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जागतिक महिला दिनानिमित्त संगमनेरात रंगणार क्रिकेट, बॅडमिंटन व रस्सीखेचचा थरार; डॉ. जयश्रीताई थोरात यांची माहिती
क्रिडा व कला

जागतिक महिला दिनानिमित्त संगमनेरात रंगणार क्रिकेट, बॅडमिंटन व रस्सीखेचचा थरार; डॉ. जयश्रीताई थोरात यांची माहिती

नावनोंदणीसाठी इच्छुकांनी यशोधन कार्यालय किंवा ७०५७०३७०३७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आणि महिला व युवतींच्या सक्षमीकरणाचा वारसा पुढे चालवत, संगमनेरमध्ये एकविरा फाउंडेशनच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत ७ मार्च ते १२ मार्च २०२६ या कालावधीत टेनिस बॉल क्रिकेट, रस्सीखेच आणि बॅडमिंटन स्पर्धा रंगणार आहेत
काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेर मध्ये या स्पर्धा होत आहेत. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या स्पर्धांचे हे सलग पाचवे वर्ष असून, अल्पावधीतच या उपक्रमाने राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शालेय विद्यार्थिनींपासून ते ६५ वर्षांच्या ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्व वयोगटातील भगिनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. भारतीय महिला क्रिकेट संघाने मिळवलेल्या जागतिक यशामुळे ग्रामीण भागातील मुलींमध्येही क्रिकेटची ओढ वाढली असून, तीच ऊर्जा या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे.
या स्पर्धेचे नियोजन तीन गटांत करण्यात आले असून, यात पहिली ते दहावी (लहान गट), अकरावी ते पदवी (मध्यम गट) आणि सर्व महिलांसाठी खुला गट असे वर्गीकरण आहे. क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेत तिन्ही गटांसाठी प्रथम ११,१०० रुपये व ट्रॉफी, द्वितीय ७,००० रुपये व ट्रॉफी आणि तृतीय ५,००० रुपये व ट्रॉफी अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.
या क्रीडा महोत्सवाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा ७ मार्च २०२६ रोजी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह कांचनताई थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे आणि आयोजक डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
सध्या एकविरा फाउंडेशनच्या वतीने स्पर्धेची जय्यत तयारी सुरू असून, जास्तीत जास्त महिला व युवतींनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी इच्छुकांनी यशोधन कार्यालय किंवा ७०५७०३७०३७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 244
एकविरा फाउंडेशन क्रिकेट जयश्री थोरात बॅडमिंटन महिला दिन रस्सीखेच
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राजधानीत लोककलेचा ऐतिहासिक गौरव: रघुवीर खेडकर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’; संगमनेरसह अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदोत्सव

May 25, 2026

पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणाच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये कॅन्डल मार्च; आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

May 4, 2026

वाढत्या उष्णतेचा धोका; नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी – डॉ. जयश्रीताई थोरात यांचे आवाहन

April 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

By अनंत पांगारकरJune 10, 20260

अकोले: अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे आज दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण स्फोट झाल्याची…

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.