Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात शिवजयंतीचा उत्साह; ‘शिवजयंती उत्सव युवक समिती’च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा, यांचा आहे समावेश…
धार्मिक

संगमनेरात शिवजयंतीचा उत्साह; ‘शिवजयंती उत्सव युवक समिती’च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा, यांचा आहे समावेश…

अध्यक्षपदी विनायक गरूडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 'आपली समिती, आपली ताकद' हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून या युवक समितीने आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाचा वारसा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही संगमनेर शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी ‘शिवजयंती उत्सव युवक समिती’ सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर समितीच्या नवनिर्वाचित नूतन पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, अध्यक्षपदी विनायक गरूडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ‘आपली समिती, आपली ताकद’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून या युवक समितीने आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला आहे.
समितीच्या या नूतन कार्यकारिणीत अनुभवी आणि उत्साही तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. उपाध्यक्ष म्हणून हर्षल जेधे आणि विजय चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असून, किरण वर्पे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. समितीच्या कामात गती आणण्यासाठी रोशन गोफणे यांची सह कार्याध्यक्षपदी, तर दत्तु थोरात यांची सेक्रेटरी आणि सिद्धार्थ दुशिंग यांची सह सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक नियोजनाची धुरा खजिनदार सौरभ उमर्जी आणि सह खजिनदार शुभम येरमल हे सांभाळणार आहेत.
उत्सवाच्या कायदेशीर बाबींसाठी कायदेविषयक सल्लागार म्हणून शोण थोरात आणि सुशांत कवडे हे मार्गदर्शन करतील. संघटन मजबूत करण्यासाठी विशाल पवार यांची शहर संघटक आणि विशाल बोह्हाडे यांची सह शहर संघटक म्हणून निवड झाली आहे. तसेच तालुक्याच्या पातळीवर संघटन करण्यासाठी प्रसाद आव्हाड यांची तालुका संघटक आणि चंदु शिंदे यांची सह तालुका संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विविध उपक्रम आणि प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मंगेश पाथरकर यांची प्रकल्प प्रमुख, तर महेंद्र भालारे आणि राज तायडे यांची सह प्रकल्प प्रमुख म्हणून वर्णी लागली आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसिद्धी प्रमुख म्हणून साईराज बोप्पा, मयुर आडेप, हित कलंत्री आणि ओम दर्वे हा चमू मेहनत घेणार आहे. या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे संगमनेर शहरात मोठ्या उत्साहात अभिनंदन करण्यात येत असून, यंदाची शिवजयंती ही विचारांची आणि शिस्तीची जत्रा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 958
शिवजयंती उत्सव युवक समिती निवडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.