Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५ चा प्रवरानगरमध्ये उत्साहात शुभारंभ
महाराष्ट्र संवाद विशेष

अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५ चा प्रवरानगरमध्ये उत्साहात शुभारंभ

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ग्रंथालयांना मिळालेले कोट्यवधींचे अनुदान आणि राहता व पाथर्डी येथे उभारल्या जाणाऱ्या डिजिटल उपकेंद्रांची माहिती त्यांनी दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

प्रवरानगर:
डिजिटल युगात तंत्रज्ञान कितीही बदलले तरी वाचन संस्कृती कधीच थांबणार नाही, उलट ती नव्या माध्यमांतून अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त करत वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त असून समाजाने यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही अहिल्या नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
प्रवरानगर येथील खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. मगरे, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सरपंच कल्पना मैड, सहायक ग्रंथ संचालक सचिन जोपुळे, साहित्यिक जयंत येलूलकर, प्रा. गणेश भगत, चंद्रकांत पालवे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका लिलावती सरोदे, प्राचार्य राम पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात शालिनीताई विखे यांनी जिल्ह्याला लाभलेली संत ज्ञानेश्वर, महिपती महाराज आणि निळोबारायांची समृद्ध आध्यात्मिक व साहित्यिक परंपरा जतन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे नमूद केले. तसेच पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ग्रंथालयांना मिळालेले कोट्यवधींचे अनुदान आणि राहता व पाथर्डी येथे उभारल्या जाणाऱ्या डिजिटल उपकेंद्रांची माहिती त्यांनी दिली.
कुलगुरू डॉ. व्ही. एम. मगरे यांनी बदलत्या काळात पारंपरिक ग्रंथालयांसोबतच डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला. प्रास्ताविकात अशोक गाडेकर यांनी ग्रामीण भागातील वाचकांना दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणे हा या ग्रंथोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. या महोत्सवाचे आकर्षण ठरलेली ग्रंथदिंडी आणि विविध प्रकाशनांच्या पुस्तक प्रदर्शनाला विद्यार्थी व नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट वाचनालयांचा आणि ग्रंथवाचकांचा गौरव करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 288
अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५ शालिनीताई विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.