Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गांजा प्रकरणाला नवे वळण; आरोपी परवेझ शेखच्या जामीनासंदर्भात न्यायालयाचा हा निर्णय
न्यायालय

गांजा प्रकरणाला नवे वळण; आरोपी परवेझ शेखच्या जामीनासंदर्भात न्यायालयाचा हा निर्णय

अर्जावरील सुनावणी दरम्यान ॲड. थोरात यांनी तपास यंत्रणेच्या तपासातील गंभीर त्रुटींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
शहर परिसरात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ३२ किलो ८४५ ग्रॅम गांजा जप्त करून खळबळ उडवून देणाऱ्या पोलीस कारवाईला आता कायदेशीर प्रक्रियेत एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या परवेझ दाऊद शेख याला संगमनेरच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, ११ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री संगमनेर शहर पोलिसांनी ‘गोल्डन सिटी’ परिसरात गुप्त माहितीच्या आधारे मोठी छापेमारी केली होती. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ३२ किलो ८४५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला होता. या मोठ्या साठ्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती आणि पोलिसांनी याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) कलम ८(क), २०(ब), आणि २२(ब) नुसार गुन्हा दाखल करून एकूण चार आरोपींना अटक केली होती.
या गुन्ह्यातील संशयित आरोपी परवेझ दाऊद शेख याच्या वतीने विधीज्ञ ॲड. शोण दिपक थोरात यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अर्जावरील सुनावणी दरम्यान ॲड. थोरात यांनी तपास यंत्रणेच्या तपासातील गंभीर त्रुटींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
एन.डी.पी.एस. कायद्यासारख्या कठोर कायद्याची अंमलबजावणी करताना ज्या कायदेशीर तरतुदींचे आणि प्रक्रियेचे पालन करणे तपास अधिकाऱ्यांवर बंधनकारक असते, त्याचे या प्रकरणात उल्लंघन झाल्याचा दावा बचाव पक्षाने केला. तसेच, या गुन्ह्यात आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे नसल्याचेही पुराव्यानिशी मांडण्यात आले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेली कागदपत्रे पडताळून पाहिल्यानंतर, अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांच्या न्यायालयाने परवेझ दाऊद शेख याचा या गुन्ह्यातील प्रथमदर्शनी सहभाग साशंक असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत न्यायालयाने शेख याचा जामीन अर्ज मंजूर केला. या कायदेशीर लढाईत ॲड. शोण थोरात यांना ॲड. प्रमोद शिंदे आणि ॲड. आकाश जाधव यांनी सहकार्य केले.
संगमनेर शहरात गेल्या काही काळापासून अंमली पदार्थांच्या विक्रीच्या संदर्भात अनेक गुन्हे दाखल झाले असून पोलीस प्रशासन कडक पावले उचलत आहे. अशा परिस्थितीत, इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडलेल्या प्रकरणातील एका आरोपीला जामीन मिळाल्याने कायदेशीर आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आता या प्रकरणातील इतर आरोपींच्या भवितव्याबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,143
अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय गांजा जामीन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026

अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचाराच्या आरोपातून युवकाची निर्दोष मुक्तता; संगमनेर अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

06/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

By Annant Ppangarkar29/08/20260

Annat Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना…

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.