Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक-पुणे महामार्गावर गुटख्याची मोठी तस्करी उघड; १२ लाखांच्या स्कॉर्पिओसह सुमारे १९ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

नाशिक-पुणे महामार्गावर गुटख्याची मोठी तस्करी उघड; १२ लाखांच्या स्कॉर्पिओसह सुमारे १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

महामार्गावर पहाटेच्या सुमारास झालेल्या या धाडसी कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

संगमनेर तालुका पोलिसांनी नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हे घाट परिसरात मोठी कारवाई करत गुटखा आणि सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १९ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ मार्च २०२६ रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे अंमलदार गस्त घालत असताना त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीचा (क्रमांक एम.एच. ४६ एक्स. ४०४६) संशय आला. पोलिसांनी या वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला मोठा साठा मिळून आला. यामध्ये ६ लाख ५३ हजार ४०० रुपये किमतीचा विमल पान मसाला आणि ६६ हजार ६०० रुपये किमतीची सुगंधी तंबाखू असा एकूण ७ लाख २० हजार रुपयांचा प्रतिबंधित माल आढळून आला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली १२ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडीही जप्त केली आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार अमित महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाम कोंडीभाऊ काळे (रा. रणखांबफाटा, संगमनेर), युसुफ चौगुले (रा. घारगाव, संगमनेर) आणि सिल्वासा येथील शक्ती ट्रेडर्सचा मालक धिरज माळी यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ९४/२०२६ नुसार बी.एन.एस. कलम १२३, २७४, २७५, २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी शाम काळे हा स्वतः वाहन चालवत होता, तर युसुफ चौगुले याच्या सांगण्यावरून सिल्वासा येथून हा माल आणला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. महामार्गावर पहाटेच्या सुमारास झालेल्या या धाडसी कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,051
गुटखा कारवाई गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: ‘आपली संस्कृती, आपला अभिमान’ या विचाराला कृतीची जोड देत…

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.