Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये शिवजन्मोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह; पारंपारिक मिरवणुकीतून दिसले एकतेचे दर्शन!
धार्मिक

संगमनेरमध्ये शिवजन्मोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह; पारंपारिक मिरवणुकीतून दिसले एकतेचे दर्शन!

या ऐतिहासिक मिरवणुकीच्या आरतीचे मानकरी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब हे ठरले. त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील, कोपरगाव तालुका प्रमुख भरत मोरे उपस्थित होते
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त काल संगमनेर शहरात निघालेली ऐतिहासिक पारंपारिक मिरवणूक म्हणजे केवळ एक सोहळा नव्हता, तर ते संगमनेरकरांच्या अखंडतेचे आणि अलोट प्रेमाचे दर्शन ठरले, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, शहर प्रमुख अमित चव्हाण यांनी म्हटले आहे.
या ऐतिहासिक मिरवणुकीच्या आरतीचे मानकरी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब हे ठरले. त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील, कोपरगाव तालुका प्रमुख भरत मोरे, शिवजयंती उत्सव युवक समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, शिवज्योत प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच शिवसेना महिला आघाडी आणि तमाम सर्वपक्षीय शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
कतारी-चव्हाण म्हणाले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि शिवजयंती उत्सव युवक समितीच्या वतीने आयोजित या भव्य मिरवणुकीत प्रत्येक संगमनेरकर ज्या उत्साहाने सहभागी झाला, त्यातून शहराच्या एकतेचा एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ घालून दिला गेला आहे.
या अभूतपूर्व सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जात-पात आणि सर्व राजकीय भेदाभेद विसरून हजारो शिवभक्त या मिरवणुकीत खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या जयघोषात अवघे संगमनेर शहर शिवमय झाले होते.
मिरवणुकीदरम्यान संगमनेरकरांनी दाखवलेला शिस्तबद्ध सहभाग आणि अभूतपूर्व प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद ठरला. या यशस्वी आयोजनाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि उत्सव समितीने सर्व संगमनेरकरांचे मनापासून आभार मानले असून, शिवरायांवरील ही भक्ती आणि आपला हा एकोपा भविष्यातही असाच कायम राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, शहरप्रमुख अमित चव्हाण, शिवजयंती उत्सव युवक समितीचे अध्यक्ष विनायक गरुडकर, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शिवसेना उबाठा शिवजयंती उत्सव अध्यक्ष अमोल डुकरे, तसेच सर्व नगरसेवक, संगमनेर सेवा समितीचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उपस्थित राहून सर्व शिवभक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 711
अमर कतारी अमित चव्हाण शिवजयंती मिरवणूक शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.