Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भव्य मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि ढोल-ताशांचा गजर ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
धार्मिक

भव्य मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि ढोल-ताशांचा गजर ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

संगमनेर शहरातील बसस्थानक परिसरात महायुतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी
“जय भवानी, जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय!” या घोषणांनी संगमनेर शहर शनिवारी अक्षरशः दणाणून गेले. शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने तब्बल सात तास शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ऐतिहासिक देखावे, ढोल-ताशांचा कडकडाट, अघोरी नृत्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आणि अफजलखान वधाचा जिवंत देखावा हे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संगमनेर नगरपालिकेपासून मिरवणुकीला उत्साहात सुरुवात करण्यात झाली. यावेळी शिवचरित्रकार एस. झेड. देशमुख, नीलम खताळ, शिवसेनेचे शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरपालिकेपासून सुरू झालेली ही भव्य मिरवणूक लालबहादूर शास्त्री चौक, बाजारपेठ, तेली खुंट, सय्यद बाबा चौक, मेन रोड, चावडी, अशोक चौक या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पोहोचली. येथे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाराजांची महाआरती करण्यात आली. त्यानंतर बसस्थानक येथे या मिरवणुकीची सांगता झाली.
मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. ठिकठिकाणी उभारलेल्या स्वागत कमानी, भगव्या पताका आणि आकर्षक फुलांची सजावट यामुळे शहर भगवेमय झाले होते.
या मिरवणुकीत शिवछत्रपती गौरव पालखी, अश्वदर्शन, हिंदू जनजागृती घोष पथक, दहा वर्षांच्या चिमुकल्यांनी सादर केलेले मर्दानी खेळ, एरियल योगा तसेच ‘आदि योगी महादेव’ यांचा देखावा यांचा समावेश होता. अफजलखान वधाचा जिवंत देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याशिवाय अघोरींचे नृत्यही उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले. मावळ येथील किंग स्टार ब्रास बँड पथक आणि एकलव्य ढोल-ताशा पथक यांच्या दमदार सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. ढोल-ताशांच्या कडकडाटात, जयघोषांच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने निघालेल्या या भव्य मिरवणुकीने संगमनेर शहरात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण केले.

सेल्फींचा वर्षाव; अश्वारूढ पुतळ्याने वेधले लक्ष – संगमनेर शहरातील बसस्थानक परिसरात महायुतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीदरम्यान हा पुतळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे दीड ते दोन लाख नागरिकांनी या ठिकाणी भेट देत पुतळ्यासोबत सेल्फी आणि छायाचित्रे काढण्याचा आनंद लुटला. तरुण-तरुणी, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहाने सहभाग नोंदवत पुतळ्याभोवती मोठी गर्दी केली होती. बसस्थानक परिसरात झालेल्या या प्रचंड गर्दीवरून संगमनेरकरांची पसंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यालाच असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 776
shivjayanti अमोल खताळ मिरवणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

आमदार अमोल खताळ शेतकऱ्यांच्या बांधावर; पिकांसंदर्भात अधिकाऱ्यांना या सूचना

01/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.