Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वडगाव पान येथील पीडित मुलीची प्रकृती स्थिर; आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दहा पथके रवाना
गुन्हेगारी

वडगाव पान येथील पीडित मुलीची प्रकृती स्थिर; आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दहा पथके रवाना

अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगत, या घटनेबाबत किंवा संशयित आरोपीबाबत नागरिकांना काहीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/03/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे काल एका अल्पवयीन मुलीवर ॲसिडसदृश पदार्थाने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अद्याप आरोपींचा पत्ता लागलेला नसला तरी दहा पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना झाली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२४(१) आणि १२६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तब्बल दहा पथके तैनात करण्यात आली आहेत.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांसह सायबर टीम आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि पीडितेने दिलेल्या वर्णनानुसार पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.

वैद्यकीय अहवालानुसार, पीडित मुलगी या हल्ल्यात ४ ते ५ टक्के भाजली असून तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात (PMT) उपचार सुरू आहेत. तज्ज्ञ जनरल फिजिशियन, नेत्ररोग तज्ज्ञ आणि प्लास्टिक सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर उपचार केले जात आहेत. सध्या पीडित मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगत, या घटनेबाबत किंवा संशयित आरोपीबाबत नागरिकांना काहीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 735
अल्पवयीन मुलीवर हल्ला पोलीस तपास सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.