Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘विठाबाई नारायणगावकर’ यांच्या तमाशा कलावंतांवर संगमनेरमध्ये जमावाचा हल्ला; महिला कलावंतांचा विनयभंग
गुन्हेगारी

‘विठाबाई नारायणगावकर’ यांच्या तमाशा कलावंतांवर संगमनेरमध्ये जमावाचा हल्ला; महिला कलावंतांचा विनयभंग

या घटनेमुळे राज्यभरातील तमाशा आणि लोककलावंतांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/04/2026Updated:02/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 
संगमनेर तालुक्यातील पठार भागात दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांवर जमावाने हल्ला केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या भीषण प्रकारात महिला कलावंतांनाही मारहाण करून त्यांचा विनयभंग करण्यात आला असून, कलावंतांची रोकडही लुटण्यात आली आहे.
बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील वरुडी पठार शिवारात ही घटना घडली. संबंधित तमाशा फड पोखरी बाळेश्वर (ता. संगमनेर) येथील कार्यक्रम आटोपून माळेगाव पठार येथे पुढील कार्यक्रमासाठी वाहनांतून जात होता. वाटेत वरुडी पठार येथील एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहने थांबली असताना, एका दुचाकीस्वाराने तमाशाच्या वाहनाला कट मारला. यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.
दुचाकीस्वाराने आपल्या साथीदारांना बोलावून घेत अवघ्या काही मिनिटांत ५० ते ६० जणांचा जमाव गोळा केला. या जमावाने तमाशा कलावंतांना बेदम मारहाण करत महिलांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांचा विनयभंग केला. तसेच कलावंतांकडील रोकडही चोरून नेल्याची माहिती विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांनी दिली आहे.
या घटनेमुळे राज्यभरातील तमाशा आणि लोककलावंतांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून, अनेक कलावंतांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी सांगितले की, ‘डायल ११२’ वर संपर्क झाल्यानंतर पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू असून, आरोपींची ओळख पटवून त्यांना कठोर कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,539
घारगाव पोलीस हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.