Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही संगमनेरात भाजपाची दयनीय अवस्था; नेत्यांच्या गटबाजीमुळे अस्तित्वाचा प्रश्न
पत्रकारिता

केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही संगमनेरात भाजपाची दयनीय अवस्था; नेत्यांच्या गटबाजीमुळे अस्तित्वाचा प्रश्न

याचा फटका केवळ भाजपलाच नाही, तर संपूर्ण महायुतीला बसला असून, शिवसेना (शिंदे गटाच्या) केवळ एका नगरसेविकेपर्यंत महायुतीचे संख्याबळ मर्यादित राहिले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/04/2026Updated:03/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, तर संगमनेरमध्ये महायुतीचे आमदार आहेत. असे असतानाही, संगमनेरमध्ये भारतीय जनता पक्षाची झालेली वाताहात सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. एकेकाळी विधानसभा निवडणुकीपर्यंत तालुक्यात प्रभावी असलेला हा पक्ष आज स्वतःच्याच अस्तित्वासाठी धडपडत असल्याचे नगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
पूर्वी सत्तेत नसतानाही प्रभावी कामगिरी करणारा हा पक्ष, आता सत्तेच्या केंद्रस्थानी असूनही पालिका निवडणुकीमध्ये भोपळाही फोडू न शकल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काय होणार अशा विवंचनेत पक्षाचे काही निष्ठावंत पदाधिकारी सापडले आहे.
संगमनेरमधील भाजपच्या या घसरणीला पक्षांतर्गत गटबाजी आणि महायुतीतील समन्वयाचा अभाव हे प्रमुख कारण मानले जात आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीचे घटक पक्ष कागदावर एकत्र असले, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात विसंवाद दिसून येतो. विधानसभा निवडणुकीच्या काळात डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपच्या माध्यमातून केलेली मोठी बांधणी वाया गेली आणि ऐनवेळी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. नाममात्र पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता तालुक्यात ताकद नसलेल्या शिवसेनेला जागा मिळाल्याने पालकमंत्री विखेंच्या मर्जीतील भाजपच्या अमोल खताळांना निवडणुकीत शिवसेनेकडून उतरवले गेले. आणि संगमनेरच्या राजकीय इतिहासात प्रथमतः ऐतिहासिक विजय मिळवत विरोधकांना यश मिळाले. हे यशच नंतर पक्षाच्या वाताहातीला कारणीभूत ठरले आहे.
भाजपच्या या पडझडीमागे पक्षातीलच काही नेत्यांची मनमानी कारभाराची वृत्ती जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. वर्षानुवर्षे पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या सक्षम कार्यकर्त्यांना डावलून घेतलेले निर्णय पक्षाला महागात पडले आहेत. विशेषतः शहराध्यक्षपदावर अनपेक्षितपणे महिलेची नियुक्ती करणे आणि ‘आम्ही सांगू तीच पूर्व दिशा’ अशी भूमिका घेणाऱ्या काही स्थानिक नेत्यांमुळे पक्षात मोठी दरी निर्माण झाली आहे. या अन्यायी धोरणांमुळेच, ज्यांच्याकडून विजयाची अपेक्षा होती, अशा अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवारी लढवत केवळ स्वतःचाच नव्हे तर पक्षाचादेखील पराभव घडवून आणला. याचा फटका केवळ भाजपलाच नाही, तर संपूर्ण महायुतीला बसला असून, शिवसेना (शिंदे गटाच्या) केवळ एका नगरसेविकेपर्यंत महायुतीचे संख्याबळ मर्यादित राहिले आहे.
सध्याच्या परिस्थितीत पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासमोर पक्ष सावरण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. संगमनेर विधानसभेत चाळीस वर्षानंतर प्रथमच सत्तांतर घडवून आणल्यानंतर या चाळीस वर्षाच्या इतिहासानंतर प्रथमत:च संगमनेर नगरपालिकेमध्ये पक्षाचा नगरसेवक दिसत नसल्याने पक्षीय कार्यकर्त्यांसाठी ही लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले जात आहे.
पक्षात आपणच सर्वस्व असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या काही मंडळींमुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. जर वेळीच पक्षांतर्गत गटबाजी मोडीत काढून निष्ठावान कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही, तर संगमनेरमधील भाजपचे अस्तित्व पूर्णपणे नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता या पराभवानंतर भाजप नेतृत्व आत्मपरीक्षण करून पक्ष पुन्हा उभारी घेतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 885
अंतर्गत कलह भाजप मतभेद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.