Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील अकरा वर्षीय मुलीवरील ॲसिड हल्ला: मंत्री अदिती तटकरे यांचा दौरा अचानक रद्द
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमधील अकरा वर्षीय मुलीवरील ॲसिड हल्ला: मंत्री अदिती तटकरे यांचा दौरा अचानक रद्द

गंभीर परिस्थितीत मंत्री अदिती तटकरे यांचा दौरा ही पीडित कुटुंबासाठी महत्त्वाची घडामोड मानली जात होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/04/2026Updated:03/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अकरा वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांचा नियोजित अहिल्यानगर जिल्हा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. मंत्री तटकरे या शनिवारी संध्याकाळी लोणी येथे येऊन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पीडित मुलीची आणि तिच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेणार होत्या. या दौऱ्यामुळे पीडित कुटुंबाला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र आता दौरा रद्द झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
येथील वडगाव पान परिसरात १७ मार्च रोजी शाळेतून घरी परतणाऱ्या एका चिमुरडीच्या चेहऱ्यावर अज्ञात व्यक्तीने ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेला बराच कालावधी उलटूनही संगमनेर आणि जिल्हा पोलीस प्रशासनाला या हल्ल्यामागील सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात अद्याप यश आलेले नाही. गुन्हेगाराचा कोणताही मागमूस पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरोपी मोकाट असल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गुन्हेगाराची माहिती देणाऱ्यास दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करूनही अद्याप प्रशासनाला ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत.
अशा गंभीर परिस्थितीत मंत्री अदिती तटकरे यांचा दौरा ही पीडित कुटुंबासाठी महत्त्वाची घडामोड मानली जात होती. मात्र, प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मंत्री तटकरे यांचा हा नियोजित दौरा रद्द झाला आहे. दौरा रद्द होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. या अनपेक्षित प्रकारामुळे पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत राजकीय स्तरावरून मिळणारा पाठिंबा लांबणीवर पडल्याची भावना व्यक्त होत आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासन किती गांभीर्याने घेते आणि आरोपीला कधी जेरबंद करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 638
अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला आदिती तटकरे दौरा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.