Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये मालपाणी उद्योग समूहाचा सामुदायिक विवाह सोहळा: १९ एप्रिल रोजी ४१ जोडपी होणार विवाहबद्ध
सामाजिक

संगमनेरमध्ये मालपाणी उद्योग समूहाचा सामुदायिक विवाह सोहळा: १९ एप्रिल रोजी ४१ जोडपी होणार विवाहबद्ध

या सोहळ्याला संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन राजेश मालपाणी यांनी केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर
येथील मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर १९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता मालपाणी लॉन्स येथे भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपणाऱ्या या सोहळ्यात ४१ जोडपी विवाहबद्ध होऊन आपल्या सहजीवनाचा श्रीगणेशा करणार आहेत. या सोहळ्याच्या माध्यमातून लग्नावरील होणारी उधळपट्टी टाळून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला जात असून, या उपक्रमाची २९ वर्षांची गौरवशाली परंपरा यंदाही तितक्याच उत्साहात साजरी होत आहे.
विवाह सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ गरजवंत किंवा मध्यमवर्गीयच नव्हे, तर अनेक उच्चशिक्षित वधू-वरांनीही ‘मालपाणी पॅटर्न’ला पसंती दिली आहे. १९९७ मध्ये स्वर्गीय ओंकारनाथजी आणि स्वर्गीय माधवलालजी मालपाणी यांनी सुरू केलेली ही संकल्पना आज वटवृक्षासारखी वाढली आहे.
आतापर्यंत या उपक्रमातून १६०० हून अधिक कुटुंबे नात्याच्या धाग्यात विणली गेली आहेत. कोणत्याही जाती-धर्माचे बंधन नसलेल्या या सोहळ्यात हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन आणि बौद्ध अशा सर्वधर्मीय वधू-वरांचे विवाह त्यांच्या संबंधित धार्मिक प्रथेनुसार आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले जातात.
या सोहळ्याचे नियोजन अतिशय नीटनेटके असते. केवळ एक रुपयाच्या नाममात्र मोबदल्यात होणाऱ्या या सोहळ्यात वधू-वरांना संसारोपयोगी साहित्याचा आहेर दिला जातो. यामध्ये स्टील कपाट, भांडी आणि रॅक अशा सुमारे तीस हजार रुपये मूल्याच्या वस्तूंचा समावेश असतो. याशिवाय, नवदाम्पत्यांनी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ओळखून एक रोप जोपासावे, या उद्देशाने प्रत्येक जोडप्याला रोपे भेट दिली जातात. या भव्य सोहळ्याला शुभाशिर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह सुमारे पंधरा ते वीस हजार नागरिक उपस्थित राहतात.
संपूर्ण सोहळ्याचे नियोजन मालपाणी उद्योग समूहाचे व्यवस्थापक रमेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्यांच्या माध्यमातून केले जाते. उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांच्यासह संचालक आणि मालपाणी परिवारातील सर्व महिला सदस्य या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतात. सामाजिक ऋण फेडण्याच्या भावनेतून गेली २९ वर्षे अव्याहतपणे सुरू असलेला हा उपक्रम राज्यात एक आदर्श म्हणून ओळखला जात असून, या सोहळ्याला संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन राजेश मालपाणी यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 573
अक्षय तृतीया मालपाणी उद्योग समूह राजेश मालपाणी सामुदायिक विवाह सोहळा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.