Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप रुग्णाचा बळी; दोषी डॉक्टरांच्या अटकेसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक, उपजिल्हाप्रमुख कतारी, शहर प्रमुख चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दिले निवेदन
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप रुग्णाचा बळी; दोषी डॉक्टरांच्या अटकेसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक, उपजिल्हाप्रमुख कतारी, शहर प्रमुख चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दिले निवेदन

डॉ. सोनांबेकर यांनी सर्व्हे नंबर १११/३७ मधील ओपन स्पेस आणि रस्त्यावर केलेले अतिक्रमण त्वरित हटवून दंडात्मक कारवाई करावी व ती जागा स्थानिक नागरिकांसाठी मोकळी करून द्यावी, अशी मागणीही संगमनेरचे मुख्याधिकारी गोरे यांच्याकडे करण्यात आली आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/04/2026Updated:08/04/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
येथील सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या गंभीर हलगर्जीपणामुळे दत्तात्रय दळवी या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील दोन्ही दोषी डॉक्टरांवर न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी, रुग्णालय सील करावे, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
संगमनेर पोलिसांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी डॉ. अभिजित कोरडे व डॉ. अजिंक्य सोनांबेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांची कृती संशयास्पद ठरल्याने या गुन्ह्याची माहिती समोर येण्यास तब्बल आठ दिवसांचा कालावधी लागला असून यादरम्यान आरोपी पसार झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांना निवेदन देऊन या संदर्भात विविध मागण्या केल्या आहे.
मागील वर्षी मार्च २०२५ मध्ये हृदयरोगाच्या उपचारासाठी दळवी यांना सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टरांकडून दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे रुग्णाच्या हाताला गँगरीन झाला आणि उपचारांमध्येही जाणीवपूर्वक विलंब करण्यात आला. या गंभीर स्थितीत डॉ. अभिजित कोरडे आणि डॉ. अजिंक्य सोनांबेकर यांनी उपचारांऐवजी पैशांची मागणी केली आणि पैसे नसल्यास रुग्णाला अन्यत्र हलविण्यास सांगून हात झटकले.
यानंतर रुग्णाला नाशिक येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिथला खर्च न परवडणारा असल्याने रुग्णाला घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले. नाशिक आणि घोटी येथील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनांबेकर हॉस्पिटल प्रशासनाच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळेच रुग्णाच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला होता. अखेर किडनी निकामी झाल्याने दळवी यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांची आर्थिक परिस्थितीही अत्यंत खालावली आहे.
शिवसेनेने या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवत संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसून शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
या आहे प्रमुख मागण्या
या प्रकरणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दोषी डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्यासोबतच त्यांचा वैद्यकीय परवाना त्वरित रद्द करावा आणि खटल्याचा निकाल लागेपर्यंत सोनांबेकर हॉस्पिटल सील करावे, अशी मागणी केली आहे. याशिवाय, डॉ. सोनांबेकर यांनी सर्व्हे नंबर १११/३७ मधील ओपन स्पेस आणि रस्त्यावर केलेले अतिक्रमण त्वरित हटवून दंडात्मक कारवाई करावी व ती जागा स्थानिक नागरिकांसाठी मोकळी करून द्यावी, अशी मागणीही संगमनेरचे मुख्याधिकारी गोरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी उपजिल्हाप्रमुख अमरभाऊ कतारी, शहरप्रमुख अमित चव्हाण, फैसल सय्यद, जिल्हासंघटक रंगनाथ फंटागरे, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, भिमाशंकर पावसे, पथ विक्रेता समिती सदस्य दीपक साळुके, युवासेना माजी शहर प्रमुख रवींद्र कानकाटे, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख, तालुका प्रमुख अशोक बढे, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितलताई हासे, उपतालुका प्रमुख भाऊसाहेब वराळे, परवेझ शेख, सदाशिव हासे, योगेश खेमनर, प्रकाश गायकवाड, असिफ तांबोळी, त्रिलोक कतारी, देविदास वराडे, रहिम बेग, संभव लोढा यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक आणि अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,365
अमर कतारी अमित चव्हाण डॉक्टरांवर गुन्हा दयानंद गोरे निवेदन मैथिली तांबे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यादी समीर बारवकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.