Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चित्रपटालाही मागे टाकेल असा कट! भोंदूगिरी आणि तोतया पोलिसांच्या मदतीने महिलेला लुटले
गुन्हेगारी

चित्रपटालाही मागे टाकेल असा कट! भोंदूगिरी आणि तोतया पोलिसांच्या मदतीने महिलेला लुटले

४० लाखांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या डोंबिवलीतील एका महिला व्यावसायिकाला बाबूराव जाधव नावाच्या व्यक्तीने नाशिकच्या विठोबा जाट या भोंदूबाबाबद्दल माहिती दिली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

भोंदूगिरी आणि तोतया पोलिसांच्या मदतीने एका महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅप्टन अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच या नवीन गुन्ह्याने नाशिक शहरात खळबळ उडाली असून फसवणुकीचे हे स्वरूप एखाद्या चित्रपटातील कथानकासारखे भासत आहे.

४० लाखांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या डोंबिवलीतील एका महिला व्यावसायिकाला बाबूराव जाधव नावाच्या व्यक्तीने नाशिकच्या विठोबा जाट या भोंदूबाबाबद्दल माहिती दिली होती. दैवी शक्तीच्या साहाय्याने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून या महिलेला नाशिकला बोलावण्यात आले. सातपूर परिसरातील अमृत गार्डन येथे सुरुवातीला विधी करून महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर मुख्य पूजेसाठी तिला सापुतारा परिसरातील निर्जन डोंगरदऱ्यात नेण्यात आले. तेथे दोन कोटी रुपये तयार झाल्याचा बनाव रचून भोंदूबाबाने नोटांनी भरलेल्या बॅगा दुरूनच दाखवल्या.

महिला त्या बॅगाजवळ जात असतानाच अचानक चार तोतया पोलिसांची तेथे एन्ट्री झाली. त्यांनी कारवाईची भीती दाखवून महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या महिलेला वाचवण्याचे नाटक करत भोंदूबाबा, दलाल आणि तोतया पोलिसांनी प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी केली. या संपूर्ण गोंधळात संबंधित महिलेचे ५ लाख ६० हजार रुपये घेऊन ही टोळी फरार झाली. फसवणुकीची ही बाब लक्षात येताच महिलेने सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

या तक्रारीवरून पोलिसांनी विठोबा जाट, बाबूराव जाधव आणि अन्य चार तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी विठोबा जाट याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अशा आंतरराष्ट्रीय रॅकेटवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 768
अंधश्रद्धा निर्मूलन समिती गुन्हेगारी फसवणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.