Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये गोवंश कत्तलींचा महाबाजार, यंत्रणांच्या तडजोडींमुळे कायद्याचे धिंडवडे; संगमनेरात कसायांनी केली मलिद्याची घट्ट युती!
पत्रकारिता

संगमनेरमध्ये गोवंश कत्तलींचा महाबाजार, यंत्रणांच्या तडजोडींमुळे कायद्याचे धिंडवडे; संगमनेरात कसायांनी केली मलिद्याची घट्ट युती!

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी गोवंश कत्तलींविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाही, प्रत्यक्षात यंत्रणांच्या अभद्र युतीमुळे जमिनीवर मात्र काहीच बदल होताना दिसत नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर

संगमनेर शहर आणि तालुक्यात सध्या गोवंश हत्या आणि मांस तस्करीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाचा धाक उरला नसल्याने की काय, पण तालुक्यात गोवंश कत्तलींचे सत्र अगदी ‘धडाक्यात’ सुरू असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी गोवंश कत्तलींविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाही, प्रत्यक्षात यंत्रणांच्या अभद्र युतीमुळे जमिनीवर मात्र काहीच बदल होताना दिसत नाही. तात्पुरत्या मलमपट्टीचा अपवाद वगळता सर्व काही जैसे थे होताना दिसत आहे. प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी, पोलीस आणि स्थानिक नेत्यांनी या कत्तलींना जणू मूक संमतीच दिल्याचे भासते.

या संपूर्ण गोरखधंद्यात पोलीस प्रशासन, बडे राजकीय नेते, पदाधिकारी, कथित पत्रकार आणि कसाई यांच्यात छुप्या अर्थपूर्ण तडजोडी झाल्याची चर्चा असून, या चोकोनी युतीमुळेच संगमनेरमध्ये गोवंश कत्तलींचे रक्त सांडत असल्याचा आरोप आता जाहीरपणे होऊ लागला आहे.

विशेष म्हणजे, ज्या संघटना आणि आंदोलक कालपर्यंत कत्तलखान्यांच्या नावाने रस्ते डोक्यावर घेत होते, ते आता अचानक चिडीचूप झाले आहेत. आंदोलने सुरू होतात आणि काही दिवसांतच त्यांना पूर्णविराम मिळतो. नेत्यांच्या व कसाई मंडळींच्या मैत्रीचे फोटो सोशल मीडियावर झळकतात, यावरून या संघटनांचा विरोध हा केवळ मलिद्यातील वाटा वाढवून घेण्यासाठी होता की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

संगमनेर शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या भागात कत्तली होतात, तिथल्या बीट मार्शलपासून ते डीबी पथकापर्यंत, पोलीस निरीक्षकापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच या अवैध धंद्यांची इत्थंभूत माहिती असते. तरीही, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जेव्हा नगरहून येऊन छापा टाकते, तेव्हाच कारवाईचे दर्शन घडते. स्थानिक पोलिसांना जे दिसत नाही, ते जिल्ह्याच्या पथकाला कसे दिसते, हा संशोधनाचा विषय आहे.

शहर पोलीस अधून-मधून एखादी किरकोळ कारवाई करून चमकण्याचा प्रयत्न करतात, मात्र मुख्य सूत्रधार आणि मोठे कत्तलखाने नेहमीच सुरक्षित राहतात. यामध्ये डीबी पथकातील काही कर्मचाऱ्यांचे थेट लागेबांधे असल्याची चर्चा पोलीस दलातच रंगली आहे.

शहरासह ग्रामीण भागातही हे जाळे पसरले आहे. संगमनेर तालुक्यातून गोमांसाची वाहतूक करणारी वाहने सुरक्षितपणे हद्दीबाहेर काढून देण्यासाठी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी चक्क सुपारी घेतल्याचे बोलले जात आहे. टनांच्या हिशोबात गोमांस पकडले जात असतानाही, मुख्य पुरवठादार मात्र मोकाट आहेत. तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सध्या संशयास्पद शांतता असून, या शांततेच्या आडून गोवंशाचा व्यापार तेजीत सुरू आहे.

या सावळ्या गोंधळात हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही प्रामाणिक आणि लढाऊ पत्रकार आजही या अवैध धंद्यांविरोधात आपली लेखणी चालवत आहेत. राजकीय दबाव, पोलिसांची डोळेझाक आणि गुन्हेगारांकडून मिळणाऱ्या धमक्यांना न जुमानता हे मोजके पत्रकार आवाज उठवत आहेत. बाकीची मोठी यंत्रणा मात्र ‘मलिद्याचा प्रसाद’ घेऊन गप्प बसणे पसंत करत असल्याचे चित्र आहे. एकंदरीत, संगमनेरमध्ये गोवंश रक्षण हे केवळ भाषणापुरते मर्यादित राहिले असून, प्रत्यक्ष व्यवहारात मात्र या रक्ताच्या पैशांवर अनेकांची घरे चालत असल्याचे दुर्दैवी वास्तव समोर आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 815
अहिल्यानगर पोलीस एलसीबी बेकायदा कत्तलखाने शहर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.