Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » फिर्यादीसाठी तिने पोलीस प्रशासनाचे झिजवले उंबरठे, अखेर डॉक्टरांवर गुन्हा दाखल मात्र संगमनेर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
पत्रकारिता

फिर्यादीसाठी तिने पोलीस प्रशासनाचे झिजवले उंबरठे, अखेर डॉक्टरांवर गुन्हा दाखल मात्र संगमनेर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

हा गुन्हा दाखल होताच संगमनेरमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या डॉक्टरांविषयी समाज माध्यमात विविध आरोप प्रत्यारोप होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/04/2026Updated:13/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर | विशेष प्रतिनिधी
संगमनेर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप रुग्णाचा बळी गेल्याचा आरोप होत आहे. पण त्याच डॉक्टरांना वाचवण्यासाठी संगमनेरचे पोलीस चार महिने तक्रारदाराला उंबरठे झिजवायला लावतात, यावरून येथील कायदा सुव्यवस्था नेमकी कोणाच्या खिशात आहे, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी अखेर न्यायालयाच्या आदेशाने डॉ. अजिंक्य सोनांबेकर आणि डॉ. अभिजीत कोरडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाने पोलीस दलातील शांततेचे वाभाडे निघाले आहेत.
दत्तात्रय दळवी या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी न्यायासाठी, आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दिलेला लढा थक्क करणारा आहे. १० डिसेंबर २०२५ रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही पोलिसांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. स्थानिक स्तरावर दाद मिळत नाही हे पाहून फिर्यादीने १८ डिसेंबरला पोलीस उपअधीक्षकांकडे धाव घेतली. मात्र, तिथेही तोच अनुभव आला. हताश झालेल्या फिर्यादीने ३० डिसेंबरला जिल्हा पोलीस अधीक्षकांचे दरवाजे ठोठावले. मात्र, पोलिसांच्या वरिष्ठ कार्यालयाकडूनही या प्रकरणाची दखल घेतली गेली नाही. डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांच्या काळात पीडित कुटुंबाला पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने वाऱ्यावर सोडले, ते पाहता पोलीस नक्की कोणाचे रक्षण करत होते, हे स्पष्ट होते.
पोलीस प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याचे पाहून फिर्यादीने अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. न्यायालयाच्या या आदेशानंतरही डॉ. सोनांबेकर आणि डॉ. कोरडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आठ दिवसांचा वेळ लागला. जे काम पोलिसांनी पहिल्या दिवशी करणे अपेक्षित होते, त्यासाठी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला, ही संगमनेर पोलिसांसाठी मोठी नामुष्की मानली जात आहे.
हा गुन्हा दाखल होताच संगमनेरमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या डॉक्टरांविषयी समाज माध्यमात विविध आरोप प्रत्यारोप होत आहे. संबंधित डॉक्टरांचे नातेवाईक अत्यंत वजनदार आणि राजकीय क्षेत्रात वावरणारे असल्यानेच पोलिसांनी इतके महिने गुन्हा दाखल टाळल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यातच आता आरोपींच्या बचावासाठी डॉक्टरांची संघटना सरसावली आहे. वरिष्ठांचा वरदहस्त आणि बड्यांचे नातेसंबंध यामुळेच खाकी वर्दी या डॉक्टर जोडगोळीसमोर नतमस्तक झाली होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल होऊन १३ दिवस उलटले तरी आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात दाखवलेली, चौकशीची ही सुस्ती संशयाची सुई अधिक गडद करत आहे.
एकीकडे सर्वसामान्य जनतेला कायद्याचा धाक दाखवणारे पोलीस, या प्रकरणात मात्र इतके ‘मवाळ’ का झाले? गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपींना सुरक्षित मार्ग मिळवून दिला गेला का? असे अनेक प्रश्न आता नागरिकांच्या मनात आहेत. संगमनेरच्या या प्रकरणाने पोलीस प्रशासनाची प्रतिमा डागाळली असून, आता या प्रकरणातील पडद्यामागील सूत्रधारांची नावे कधी समोर येणार आणि पीडित कुटुंबाला खरा न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास जनआंदोलनाचा भडका उडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,101
गुन्हा सोनांबेकर हॉस्पीटल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar29/08/20260

आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात…

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.