Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » व्हाट्सअपवर ग्रुपवर राहुल गांधींना ‘वाबराचे वंशज’ संबोधणाऱ्या श्याम तिवारींवर गुन्हा
गुन्हेगारी

व्हाट्सअपवर ग्रुपवर राहुल गांधींना ‘वाबराचे वंशज’ संबोधणाऱ्या श्याम तिवारींवर गुन्हा

गेल्या काही दिवसापासून समाज माध्यमातून टीकाटिप्पणी आक्षेपार्ह स्वरूपात होत असल्याने अशा ग्रुपकडे पोलिसांनी सतर्कतेने बघण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे यातील काही व्हाट्सअप ग्रुप वर पोलीस अधिकारी देखील आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/05/2026Updated:06/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

‘सौ शहरी एक संगमनेर’ या व्हाट्सअप ग्रुपवर काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी संगमनेर मधील श्याम तिवारी यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सध्या संगमनेर मधील बहुतांशी व्हाट्सअप ग्रुप, समाज माध्यमांवर कोणाबद्दलही आक्षेपार्ह भाषेत टीकाटिप्पणी करून सामाजिक वातावरण दूषित करण्याचे प्रकार सुरू आहे. गेल्या काही दिवसात समाज माध्यमांवर केलेल्या अशा प्रकारच्या टीका टिपणीमुळे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसापासून समाज माध्यमातून टीकाटिप्पणी आक्षेपार्ह स्वरूपात होत असल्याने अशा ग्रुपकडे पोलिसांनी सतर्कतेने बघण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे यातील काही व्हाट्सअप ग्रुप वर पोलीस अधिकारी देखील आहे. दोन दिवसांपूर्वी जागो संगमनेर या व्हाट्सअप ग्रुपच्या सदस्य आणि एडमिनवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून काही तास उलटत नाही तोच व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते असलेल्या प्रकाश कडलग यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा चर्चेत आला आहे.

कडलग यांनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ‘सौ शहरी एक संगमनेरी’ नावाचा व्हाट्सअप ग्रुप असून संजय क्षत्रिय त्या ग्रुपचे ॲडमिन आहेत. १४ मार्च २०२६ रोजी सकाळी ते घरी असताना या ग्रुपवर अजित मणियार यांनी टाकलेल्या पोस्टला श्याम तिवारी (रा. देवाचा मळा) यांनी राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत टीकाटिप्पणी करून ‘राहुल गांधी हे बाबराचे वंशज आहे’, असा बदनामीकारक उल्लेख करून त्यांची बदनामी केली.

या तक्रारीच्या आधारे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात रजिस्टर नंबर ५००/२०२६ बी एम एस कलम ३५६(२) नुसार व अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 471
अदखलपात्र गुन्हा आक्षेपार्ह टिप्पणी समाज माध्यम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.