Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुरुजींचे मद्यधुंद वर्तन: अल्पवयीन मुलाच्या हाती कारचे स्टेअरिंग देऊन प्रवाशांचा जीव धोक्यात; अकोले तालुक्यातील घटना
महाराष्ट्र संवाद विशेष

गुरुजींचे मद्यधुंद वर्तन: अल्पवयीन मुलाच्या हाती कारचे स्टेअरिंग देऊन प्रवाशांचा जीव धोक्यात; अकोले तालुक्यातील घटना

या शिक्षकाच्या बेजबाबदारपणामुळे रस्त्यावरील निष्पाप लोकांचा बळी गेला असता, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभाग नेमकी काय पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले

समाजात ‘गुरुजी’ या पदाला अत्यंत आदराचे स्थान आहे, मात्र अकोले तालुक्यातील एका घटनेने या पदाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. आपल्या अल्पवयीन मुलाला कार चालवायला देऊन आणि स्वतः मद्याच्या नशेत धुंद राहून एका शिक्षकाने बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित शिक्षकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (३ मे) अकोले तालुक्यातील गुरवझाप पीरसाईनगर येथील शिक्षक रामदास भांगरे हे त्यांच्या कुटुंबासह स्विफ्ट कारने (क्रमांक MH 02 BJ 9347) प्रवास करत होते. यावेळी शिक्षक भांगरे हे स्वतः मद्यधुंद अवस्थेत होते आणि त्यांनी कारचे नियंत्रण स्वतःकडे न ठेवता आपल्या अवघ्या १० ते ११ वर्षांच्या मुलाच्या हाती स्टेअरिंग दिले होते. हा अल्पवयीन मुलगा भरधाव वेगाने कार चालवत होता आणि रस्त्यावरील इतर वाहनांना अतिशय धोकादायक पद्धतीने कट मारत होता.

हा प्रकार नवलेवाडी फाट्याजवळ उपस्थित असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आला. कार चालवणारा मुलगा लहान असल्याचे पाहून आणि गाडीचा वेग धोकादायक असल्याने निखिल रावसाहेब चौधरी व इतर प्रवाशांनी पथिक पेट्रोल पंप परिसरात ही कार थांबवली. नागरिकांनी जेव्हा संबंधित शिक्षकाला विचारणा केली आणि मुलाच्या हातात गाडी देणे कायद्याने गुन्हा असल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शिक्षक रामदास भांगरे यांनी आपली चूक मान्य करण्याऐवजी नागरिकांशीच हुज्जत घातली. त्यांनी अत्यंत उद्धटपणे आणि मगरुरीने वागणूक दिल्याने उपस्थितांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून त्यामध्ये अल्पवयीन मुलगा कार चालवताना स्पष्ट दिसत आहे. तक्रारदार निखिल चौधरी यांनी या प्रकरणी पंचायत समिती अकोले येथील महिला व बालकल्याण विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीसोबत व्हिडिओ आणि फोन कॉल रेकॉर्डिंगचे पुरावे जोडण्यात आले आहेत. दरम्यान, या विषयावर जाब विचारला म्हणून बाळू खाडे नावाच्या अन्य एका शिक्षकाने तक्रारदाराला फोन करून दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला असून, यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

तक्रारदाराने या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १२५ (मानवी जीवितास धोका निर्माण करणे), कलम ३५१(२) (धमकावणे) तसेच बाल न्याय अधिनियम २०१५ आणि मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित शिक्षकावर शिक्षण विभागामार्फत तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी आणि त्या अल्पवयीन मुलाला बाल कल्याण समितीमार्फत समुपदेशनासाठी पाठवावे, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार आणि नियम पाळण्याचे धडे देणारे शिक्षकच जर मद्यधुंद अवस्थेत असे बेकायदेशीर कृत्य करत असतील, तर समाजाने कोणाकडे पाहावे, असा प्रश्न अकोले तालुक्यातील नागरिक विचारत आहेत. या शिक्षकाच्या बेजबाबदारपणामुळे रस्त्यावरील निष्पाप लोकांचा बळी गेला असता, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभाग नेमकी काय पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,598
अल्पवयीन मुलाच्या हाती कार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.