Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वैद्यकीय अधिकाऱ्याची बदनामी केल्याप्रकरणी वृत्तपत्र संपादकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल
गुन्हेगारी

वैद्यकीय अधिकाऱ्याची बदनामी केल्याप्रकरणी वृत्तपत्र संपादकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल

अशा प्रकारची खोटी बातमी प्रसिद्ध केल्यामुळे समाजात आपली प्रतिमा मलिन झाली असून मोठी बदनामी झाली असल्याची तक्रार डॉ. थोरात यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

वैद्यकीय अधिकाऱ्याची बदनामी केल्याप्रकरणी संगमनेरात वृत्तपत्र संपादकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत सुरेश थोरात यांची समाजमाध्यमे आणि वृत्तपत्राद्वारे बदनामी केल्याप्रकरणी ‘बांधीलकी जनहिताची… नायक’ या सायं दैनिकाचे संपादक गोरक्षनाथ मदने आणि कार्यकारी संपादक शाम तिवारी यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की, ९ मे २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे सिद्धार्थ नितीन कुमार या २७ वर्षीय तरुणाला मृत अवस्थेत आणण्यात आले होते. डॉ. थोरात यांनी कर्तव्यावर असताना मृतदेहाची तपासणी केली असता, मृताच्या नाका-तोंडातून रक्त येत असल्याचे आणि डोळे सुजलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

हा मृत्यू संशयास्पद वाटल्याने आणि मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे या उद्देशाने डॉ. थोरात यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्रवरा लोणी येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी सकाळी साडे आठच्या सुमारास रेफर लेटर दिले होते.

मात्र, या शासकीय कर्तव्याचे पालन करत असतानाच १२ आणि १३ मे २०२६ रोजी ‘नायक’ वेब पोर्टल आणि सायं दैनिकातून डॉ. प्रशांत थोरात यांच्या विरोधात खोटी बातमी प्रसारित करण्यात आली.

या बातमीमध्ये डॉ. थोरात यांच्यासाठी ‘दानव’, ‘दलाल’ आणि ‘पांढरा हत्ती’ यांसारख्या अत्यंत अपमानजनक शब्दांचा वापर करण्यात आला. कोणतीही शहानिशा न करता अशा प्रकारची खोटी बातमी प्रसिद्ध केल्यामुळे समाजात आपली प्रतिमा मलिन झाली असून मोठी बदनामी झाली असल्याची तक्रार डॉ. थोरात यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

डॉ. थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३५६(२) अन्वये संपादक गोरक्षनाथ मदने आणि कार्यकारी संपादक शाम तिवारी यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भांगरे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,064
अदखलपात्र गुन्हा नायक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.