Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात सराव दरम्यान हँडग्रेनेडचा स्फोट; चार प्रशिक्षणार्थी जवान जखमी
महाराष्ट्र संवाद विशेष

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात सराव दरम्यान हँडग्रेनेडचा स्फोट; चार प्रशिक्षणार्थी जवान जखमी

या स्फोटात शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळंके हे चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/05/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर:

येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर नियमित प्रशिक्षण सुरू असताना एका स्मोक हँडग्रेनेडचा अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून मुख्यालय परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या स्फोटात शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळंके हे चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यापैकी दोघांच्या हाताच्या बोटांना अत्यंत गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. यातील काही जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, जमाव नियंत्रणात आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्मोक हँडग्रेनेडची हाताळणी कशी करावी, याबाबत प्रशिक्षणार्थी जवानांना मार्गदर्शन केले जात होते. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सुरू असतानाच संबंधित जवानाने ग्रेनेडची पिन काढली. मात्र, त्याच वेळी त्यांच्या हातातील लिव्हर अचानक निसटल्याने ग्रेनेडचा हातातच मोठा स्फोट झाला.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशिक्षण प्रक्रियेत अधिक कडक सुरक्षा उपाययोजना राबवल्या जातील.

या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, प्रशिक्षणादरम्यान वापरल्या जाणाऱ्या स्फोटक साहित्याच्या सुरक्षिततेचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 579
अहिल्यानगर स्मोक हँडग्रेनेडचा स्फोट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.