Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शेतीला सक्षम केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही- लोकनेते बाळासाहेब थोरात शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाची व्यापक तयारी- मंत्री जयकुमार रावल

July 12, 2026

रविवार विशेष लेख — म्हणजे चोरी झालीच नाही?

July 12, 2026

रविवार विशेष लेख : महाराष्ट्राची बदनामी कशी होते, इन्फ्राभाऊ?

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध गोवंश तस्करी व गोमांसावर संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई; ३९ गोवंश हस्तगत, २६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

अवैध गोवंश तस्करी व गोमांसावर संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई; ३९ गोवंश हस्तगत, २६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

ऐन सणाच्या तोंडावर पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसांनी अवैध गोवंश आणि गोमांस तस्करीविरोधात एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी वेगवेगळ्या भागात छापे टाकून तब्बल ३९ गोवंश ताब्यात घेतले असून, त्यांची अंदाजे किंमत २६ लाख ७० हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

२८ आणि २९ मे रोजी साजरा होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात तसेच परिसरात कोणत्याही प्रकारे अवैध गोवंश किंवा गोमांसाची वाहतूक व विक्री होऊ नये, यासाठी जास्तीत जास्त कारवाया करण्याचे आदेश अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिले होते. या सूचनांचे गांभीर्य ओळखून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ मे च्या रात्रीपासून ते २७ मे २०२६ च्या पहाटेपर्यंत वेगवेगळ्या संशयास्पद परिसरांमध्ये एकाच वेळी अचानक छापे टाकण्यात आले.

या संपूर्ण कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध गोवंश जप्त करण्यात यश मिळवले. कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व ३९ गोवंशांना तातडीने पुढील सुरक्षिततेसाठी आणि योग्य देखभालीसाठी सायखिंडी (ता. संगमनेर) येथील ‘जीवदया गोशाळेत’ पाठवण्यात आले आहे. ऐन सणाच्या तोंडावर पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशाने आणि संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, आत्माराम पवार, राहुल पांडे, रामकिसन मुकरे, विजय खुळे, अनिल खताळ, सागर नागरे, संदीप कोंडे आणि सागर पठाडे आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 916
गोवंश कत्तल गोवंश कारवाई गोवंश जनावरे संगमनेर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धक्कादायक घटना! बिलाच्या वादातून हॉटेल चालकाची कोयत्याने वार करून भरदिवसा हत्या, चुलत भाऊ गंभीर जखमी… अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

July 11, 2026

श्रीरामपूर विभागातील ६८ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई; अपर पोलीस अधीक्षकांचा गुन्हेगारी टोळ्यांना दणका

July 7, 2026

गुन्हेगारी सोडली नाही तर थेट जेल! १७ पोलीस ठाण्यांतील १२१ आरोपींचे ‘काऊन्सेलिंग’ आणि परेड

July 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
यश / निवड / पुरस्कार

शेतीला सक्षम केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही- लोकनेते बाळासाहेब थोरात शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाची व्यापक तयारी- मंत्री जयकुमार रावल

By अनंत पांगारकरJuly 12, 20260

नाशिक: जयहिंद लोकचळवळीच्या कृषी विभागातर्फे आयोजित ‘राज्यस्तरीय युवा शेतकरी सन्मान सोहळा २०२६’ उत्साहात पार पडला.…

रविवार विशेष लेख — म्हणजे चोरी झालीच नाही?

July 12, 2026

रविवार विशेष लेख : महाराष्ट्राची बदनामी कशी होते, इन्फ्राभाऊ?

July 12, 2026

आज रविवार, १२ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.