Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शेतीला सक्षम केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही- लोकनेते बाळासाहेब थोरात शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाची व्यापक तयारी- मंत्री जयकुमार रावल

July 12, 2026

रविवार विशेष लेख — म्हणजे चोरी झालीच नाही?

July 12, 2026

रविवार विशेष लेख : महाराष्ट्राची बदनामी कशी होते, इन्फ्राभाऊ?

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगरमध्ये एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

अहिल्यानगरमध्ये एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर:

नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जयेश मोतीलाल गांगुर्डे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून, त्यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या मामासह अन्य १५ नातेवाईकांवर दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराच्या नातेवाईकांवर ११ मे २०२६ रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत होते. या तपासात सहकार्य करण्यासाठी गांगुर्डे यांनी सुरुवातीला दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने १८ मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.

त्यानंतर त्याच दिवशी पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर येथे लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणी दरम्यान जयेश गांगुर्डे यांनी तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्यास संमती दर्शवली. लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर बुधवारी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस काँस्टेबल किशोर कुळधर आणि शेखर वाघ यांच्या पथकाने केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे करत आहेत. ही संपूर्ण कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे आणि पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपूटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 550
अहिल्यानगर लाचलुचपत लाचलुचपत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धक्कादायक घटना! बिलाच्या वादातून हॉटेल चालकाची कोयत्याने वार करून भरदिवसा हत्या, चुलत भाऊ गंभीर जखमी… अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

July 11, 2026

श्रीरामपूर विभागातील ६८ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई; अपर पोलीस अधीक्षकांचा गुन्हेगारी टोळ्यांना दणका

July 7, 2026

गुन्हेगारी सोडली नाही तर थेट जेल! १७ पोलीस ठाण्यांतील १२१ आरोपींचे ‘काऊन्सेलिंग’ आणि परेड

July 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
यश / निवड / पुरस्कार

शेतीला सक्षम केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही- लोकनेते बाळासाहेब थोरात शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाची व्यापक तयारी- मंत्री जयकुमार रावल

By अनंत पांगारकरJuly 12, 20260

नाशिक: जयहिंद लोकचळवळीच्या कृषी विभागातर्फे आयोजित ‘राज्यस्तरीय युवा शेतकरी सन्मान सोहळा २०२६’ उत्साहात पार पडला.…

रविवार विशेष लेख — म्हणजे चोरी झालीच नाही?

July 12, 2026

रविवार विशेष लेख : महाराष्ट्राची बदनामी कशी होते, इन्फ्राभाऊ?

July 12, 2026

आज रविवार, १२ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.