Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन
आवाहन

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

श्रीरामपूर:

श्रीरामपूर शहर व परिसरात वाढत्या अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेला अटकाव घालण्यासाठी आणि तरुणांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी श्रीरामपूर पोलिसांच्या वतीने उद्या, शुक्रवारी एका भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नशा मुक्त अभियानाअंतर्गत आयोजित या उपक्रमाद्वारे ‘ड्रग फ्री श्रीरामपूर’चा नारा देण्यात येणार असून, या रॅलीत श्रीरामपूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.

ही भव्य जनजागृती रॅली उद्या सकाळी साडेसात वाजता आर.एन.बी. कॉलेजच्या क्रीडांगणावरून सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी पंकज आशिया तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रमुख मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. रॅलीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देत समाजातील प्रत्येक घटकाला या लढ्यात एकत्र आणण्याचा पोलिसांचा मानस आहे.

या जनजागृती मोहिमेत श्रीरामपूर शहर व परिसरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांसोबतच विविध स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, सुजाण नागरिक, महिला मंडळे तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही या उपक्रमात सामील होण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. या रॅलीसाठी पांढरा टी-शर्ट, स्पोर्ट्स पॅन्ट आणि स्पोर्ट्स शूज असा विशिष्ट ड्रेसकोड निश्चित करण्यात आला आहे. श्रीरामपूरला व्यसनमुक्त करण्यासाठी आणि या ज्वलंत सामाजिक प्रश्नाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून ही रॅली यशस्वी करावी, अशी विनंती पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 336
आवाहन नशा मुक्ती रॅली सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

04/08/2026

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

02/08/2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

24/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.