Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर
शिक्षण

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवड समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नाटककार अभिराम भडकमकर यांच्यासह इतर सदस्यांनी या ग्रंथांची अंतिम निवड केली आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने २०२४ या वर्षासाठीची शासनमान्य ग्रंथ निवडसूची नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या अधिकृत यादीत संगमनेर येथील प्रसिद्ध लेखक, पत्रकार आणि शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे यांच्या चार पुस्तकांचा एकाच वेळी समावेश करण्यात आल्याने अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुण्याच्या प्रसिद्ध ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या ‘शिक्षण नामा’, ‘परिवर्तनाची वाट’, ‘विनोबाची शिक्षण छाया’ आणि ‘शिक्षण शोध’ या चारही पुस्तकांची निवड राज्य शासनाच्या ग्रंथ निवड समितीने केली आहे. एकाच लेखकाची, एकाच विषयावरील आणि एकाच प्रकाशकाची चार पुस्तके एकाच वेळी शासनमान्य सूचीत समाविष्ट होण्याची ही दुर्मीळ घटना मानली जात आहे.
संदीप वाकचौरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण या एकाच विषयाला वाहून घेत महाराष्ट्रातील विविध प्रमुख वृत्तपत्रांमधून सातत्याने प्रगल्भ स्तंभलेखन केले आहे. वाकचौरे यांची आतापर्यंत सुमारे वीस पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांपैकी तब्बल १७ पुस्तके एकट्या चपराक प्रकाशनाने बाजारात आणली आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या अनेक पुस्तकांना यापूर्वीही शासनमान्य यादीत स्थान मिळाले आहे.
या पुस्तकांना महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक शिवाजीराव तांबे, डॉ. शकुंतला काळे, दिनकर पाटील, दिनकर टेमकर, ज्येष्ठ शिक्षण विचारवंत ह. ना. जगताप, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे आणि शिक्षण अभ्यासक नामदेव माळी यांसारख्या शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांच्या प्रस्तावना लाभल्या आहेत.
राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवड समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नाटककार अभिराम भडकमकर यांच्यासह इतर सदस्यांनी या ग्रंथांची अंतिम निवड केली आहे. एकाच वेळी चार पुस्तकांची निवड झाल्याबद्दल संगमनेरसह राज्यभरातील शैक्षणिक आणि साहित्यिक वर्तुळातून वाकचौरे व चपराक प्रकाशनाचे कौतुक केले जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 93
निवड सूची पुस्तक शिक्षण संदीप वाकचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने २०२४ या वर्षासाठीची शासनमान्य ग्रंथ निवडसूची…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.