Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘पीएफआय’ इस्लामिक संघटनेचे धागेदोरे संगमनेरपर्यत
गुन्हेगारी

‘पीएफआय’ इस्लामिक संघटनेचे धागेदोरे संगमनेरपर्यत

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/09/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

भल्या पहाटेच्या कारवाईत उत्तर जिल्हाप्रमुख मौलानाला पोलिसांनी घेतले ताब्यात 

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

दहशतवादी संघटनांशी निगडीत असलेल्या पॉप्युलर फ्रंन्ट ऑफ इंडिया ‘पीएफआय’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांचे धागेदोरे आता संगमनेरपर्यत येऊन पोहचले आहेत. या संघटनेशी निगडीत असल्याच्या कारणावरुन नगर जिल्ह्यात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून यात संगमनेरमधील एका मौलानाचा समावेश आहे. मंगळवारी भल्या पहाटे स्थानिक पोलिसांनी केलेल्या या कारवाईत केंद्रीय तपास यंत्रणादेखील कार्यरत होती.

संगमनेर शहरालगतच्या संगमनेर खुर्द येथे आणि नगर शहरात ही कारवाई करण्यात आली. नगरमधून या संघटनेशी निगडीत असलेल्या विभागीय अध्यक्षाला तर संगमनेर खुर्द येथून उत्तर जिल्हाप्रमुख असलेल्या एका मौलानाला ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरोधात सुरु असलेल्या कारवाईबद्दल गोपनीयता बाळगली जात असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती देण्यात आली.

पहाटेच्या दरम्यान संगमनेर खुर्दमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या पथकाचा समावेश होता. या कारवाईत पीएफआय या इस्लामी सोबत कार्यरत असलेल्या मौलानाला ताब्यात घेण्यात आले. मौलानाविरोधात संगमनेर पोलिसांनी १५१(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

            पीएफआय (PFI) या इस्लामी संघटनेविरोधात देशभर कारवाई सुरु असून आत्तापर्यत याचे धागेदोरे नगर जिल्ह्यापर्यत पोहोचले नव्हते. केंद्रीय तपास यंत्रणांनी राज्यात पुणे, बीड, अमरावती, औरंगाबाद, नाशिक आदी जिल्ह्यात संघटनेच्या कार्यालयांवर व निगडीत असलेल्यांवर छापेमारी करुन अनेकांना अटक केली आहे. आता नगर शहरासोबतच संगमनेरमध्येदेखील या संघटनेचे धागेदोरे आढळून आल्याच्या कारणावरुन ही छापेमारी करण्यात आली. संघटनेत कार्यरत असलेल्या लोकांवर तपास यंत्रणेचे बारीक लक्ष आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 209
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.