Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, गुरुवार, १६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखाना तालुक्याची कामधेनू
शेती व सहकार

थोरात कारखाना तालुक्याची कामधेनू

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 27, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अध्यक्ष बाबा ओहोळ यांचे प्रतिपादन

आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासाची वाटचाल

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

थोरात कारखाना ही तालुक्याची कामधेनु आहे. सहकाराबरोबर ग्रामीण विकास व आर्थिक चक्र तालुक्यात फिरत आहे. ही संगमनेरात विकासाची संस्कृती आहे. काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुका सर्व क्षेत्रात अग्रगण्य आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला, त्यामुळे कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी. असे प्रतिपादन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा सन 2022 – 2023 या गळित हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदिपन समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, लक्ष्मण कुटे, इंद्रजित थोरात, संतोष हासे, आरती थोरात,अमित पंडित, गणपतराव सांगळे, माधव हासे, अजय फटांगरे, आर. एम. कातोरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

ओहोळ म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्वावर कारखान्याची वाटचाल सुरु आहे. त्याचबरोबर माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकारासह तालुक्यात सातत्यपूर्ण विकास सुरु आहे. ऊस हे शास्वत पिक असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी असे आवाहन त्यांनी केले.

कांचनताई थोरात म्हणाल्या, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे नाव असलेला कारखाना आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारात कायम लौकिकास्पद राहिला असून या कारखान्याने तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.

प्रास्तविकात कार्यकारी संचालक घुगरकर म्हणाले, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस आहे. कार्यक्षेत्रात सुमारे 6 लाख मेट्रीक टन ऊसाची निर्मिती होणार आहे. तर बाहेरील ऊस उत्पादकांचा आपल्या कारखान्यावर विश्‍वास असल्याने बाहेरील ऊस आणून 13 लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट कारखान्याने ठेवले आहे. कारखान्याचे सर्व ओव्हर ऑईलींगचे काम पुर्ण होत असून 10 ऑक्टोबरपासून कारखाना सुरु करण्याचे उदिष्ट आहे.

“कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात व त्यांच्या पत्नी आरतीताई यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदिपन करण्यात आले. तर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे व त्यांच्या पत्नी मनिषा, रमेश गुंजाळ व त्यांच्या पत्नी ममता, इंद्रजित खेमनर व त्यांच्या पत्नी सोनाली खेमनर, विनोद हासे व त्यांच्या पत्नी वैशाली हासे, अनिल काळे व त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली”.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 207
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

July 13, 2026

२२ लाखांचा बेकायदेशीर खतसाठा जप्त; ‘कृषी गौरव फर्टिलायझर्स’चा परवाना निलंबित, मालकावर गुन्हा दाखल

June 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, गुरुवार, १६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 16, 20260

आजचे राशिभविष्य मेष – आजच्या दिवशी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा समाजात मोठा प्रभाव पडेल. सार्वजनिक जीवनात मान,…

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.