Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात अमृतकाळ : केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल
राजकारण

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात अमृतकाळ : केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल

पार्टी जोडू न शकणारे देश कसा जोडणार , देशात गरीबाला मिळतोय न्याय
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 1, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

गेल्या ८ वर्षामध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये अमृतकाळ निर्माण झाला. यापूर्वी देशात अनेक पक्षांची सरकारं सत्तेवर होती. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच योजनांची वेळेत पुर्तता, सुरु असलेल्या योजनांचे कामं वेळेत पूर्ण करणे, यामुळेच देशामध्ये प्रथमच गरीबाला न्याय मिळत असून, यापूर्वीचे सरकार आणि मोदींचे सरकार यामध्ये निश्चितच फरक दिसत असल्याची माहिती केंद्रीय अन्नप्रक्रीया आणि जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी दिली.

लोकसभा प्रवास योजनेच्या पार्श्वभूमीवर पटेल यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात मागील दोन दिवसांपासून दौरा सुरु केला आहे. संगमनेर येथे त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या योजनांची अंमलबजावणी तसेच देशात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.

यावेळी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे प्रभारी रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, सरचिटणीस सुनिल वाणी, जालिंदर वाकचौरे आदी उपस्थित होते.

            काँग्रेसच्या सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेवर टीका करत पटेल म्हणाले, कॉग्रेस पक्षाकडे आता नेतृत्व राहिलेले नाही. ज्यांच्याकडे नेतृत्व क्षमता, समज नाही ते आज देशभरात काँग्रेसची यात्रा घेवून निघाले आहेत. मात्र जे पार्टी जोडू शकत नाहीत ते देश काय जोडणार? असा सवाल करत या पक्षाला देशाच्या नव्हे तर स्वत:च्या अस्तित्वाची चिंता निर्माण झाली आहे. सत्तेपासून दूर गेल्यामुळे हा पक्ष बेचैन झाला आहे. ८० चे दशक असो की, आत्ताचे ज्या-ज्या वेळेस काँग्रेस सत्तेपासून दूर गेली त्यावेळेस या पक्षाने राष्ट्रविरोधी शक्तीशी हातमिळवणी करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. पीएफआय संघटनेवर बंदी घातल्यानंतर कोणतीही प्रतिक्रीया या पक्षाकडून पुढे आली नाही. त्यामुळेच या पक्षाला आता देशापेक्षा स्वत:च्या अस्तित्वाची अधिक चिंता सतावत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहेच, महागाई कमी करण्याची जबाबदारीसुद्धा सरकारने स्विकारली असून देशातील जनतेचे जीवन अधिक सुकर होण्यासाठी त्यांना विविध योजनांचा आधार देण्याचे महत्वपूर्ण काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु आहे. अमेरिकेप्रमाणे भारतातही आता महिला आर्थिक क्षेत्रात करीत असलेल्या वेगवेगळ्या यशस्वी प्रयोगांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला निश्चितच बळ मिळेल.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 121
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांडगाव शिवारात एका १५ वर्षीय…

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.