Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्वच्छ सर्वेक्षण | पश्चिम विभागात संगमनेर पालिका देशात तिसरी
विकास

स्वच्छ सर्वेक्षण | पश्चिम विभागात संगमनेर पालिका देशात तिसरी

कचरामुक्त शहरांतर्गत थ्री स्टारचे मानांकन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/10/2022Updated:03/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात संगमनेर नगर परिषदेने पश्चिम विभागात देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. तसेच कचरा मुक्त शहराअंतर्गत थ्री स्टारचे मानांकन देखील पालिकेत प्राप्त झाल्याची माहिती प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आणि मुख्याधिकारी राहुल वाघ दिली.

2022 मध्ये झालेल्या या स्पर्धेचे मानांकन नुकतेच जाहीर करण्यात आले असून संगमनेर नगर परिषदेने पुन्हा एकदा नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी या अभियानात मोठी मेहनत घेत संगमनेर कचरा मुक्त करण्यात आणि या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने पालिकेला कोट्यावधी रुपये बक्षीस मिळून देण्याचे काम केले होते. आता प्रशासकीय कालावधीत देखील हाच पायंडा कायम राहिला आहे.

केंद्र शासनाच्यावतीने देश पातळीवर सर्व राज्यातील नगर परिषदांसाठी स्वच्छ सर्वेक्षण २०२२अभियान राबविण्यात आले. शासनाच्या या स्पर्धात्मक उपक्रमात संगमनेर नगर परिषदेने सहभागी होऊन स्वच्छतेबाबत उत्कृष्ट कामगिरी करतांना कचरामुक्त शहर अंतर्गत थ्री स्टार, हागणदारीमुक्त शहरांतर्गत ओडीएफ ++ तसेच स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत देश पातळीवर पश्चिम विभागात तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त केले.

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शहरातील नागरिक, विविध शैक्षणिक, सामाजिक संस्था यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मोलाचे सहकार्य केले. याबद्दल संगमनेर शहरवासीयांचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी आभार मानून यापुढील काळातही असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले.

‘स्वच्छ सुंदर व हरित संगमनेर’ शहराचे संकल्पना घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात विकास कामांबरोबरच शहराच्या सर्वांगीण स्वच्छते बरोबरच रस्त्याच्या दुतर्फा व शहरात इतरत्र मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले असून स्वच्छतेबाबत नगरपरिषदेने शासन पुरस्कृत स्पर्धेत सहभागी होऊन अनेक मानांकन व पुरस्कार प्राप्त केले आहे. यात संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान, महाराष्ट्र शासन उत्कृष्ट नगरपरिषद पुरस्कार, स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत जीएफसी स्टार रेटिंग, ओडीएफ ++ अंतर्गत भारतात पश्चिम विभागात पाचवा क्रमांक तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महिला व बालकल्याण विभाग उत्कृष्ट पुरस्कार, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दुसरा क्रमांक, तसेच माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सन २०२१/२२ मध्ये नाशिक विभागात उत्कृष्ट कामगिरी करत विविध पुरस्कार पालिकेला मिळाले आहे.

मुख्याधिकारी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोरडे, कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ, आरोग्य विभागप्रमुख अश्विन पुंड, प्र. आरोग्य निरीक्षक अरविंद गुजर यांच्यासह उमेश ढोले, संगणक अभियंता विशाल कोल्हे, गौरव मंत्री, सुरेश चिंचे, बाळासाहेब साळवे, शशिकांत जोशीसह विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहर स्वच्छतेसाठी परिश्रम घेतले.

संगमनेर नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पश्चिम विभागात देशात तिसरा क्रमांक मिळविल्याचा निश्चितच अभिमान असून यामध्ये शहरातील नागरिकांचे मोठे योगदान व सहकार्य लाभले. हे यश सर्व शहरवासीयांचे आहे. यापुढील काळातही स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येऊन स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत संगमनेर नगर परिषदेला प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.
डॉ. शशिकांत मंगरूळे, प्रशासक तथा प्रांताधिकारी

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 126
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला १०.५० कोटींचा निधी; दोन मोठ्या पुलांचे काम मार्गी – आमदार अमोल खताळ

18/12/2025

एमआयडीसीसाठी उपलब्ध जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश, आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश – पठारातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी ‘गुड न्यूज’

18/12/2025

संगमनेरच्या केशवतीर्थाला आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून स्मार्ट टच! महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम लवकरच

24/10/2025
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.