Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आठवण । शिवसेनेच्या १९८२ च्या दसऱ्या मेळाव्याला उपस्थित होते शरद पवार अन् जॉर्ज फर्नांडीस
विश्लेषण

आठवण । शिवसेनेच्या १९८२ च्या दसऱ्या मेळाव्याला उपस्थित होते शरद पवार अन् जॉर्ज फर्नांडीस

उपस्थित शिवसैनिकांसमोर केली होती भाषणे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग घडवून आणणाऱ्या आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार टीकेचे धनी ठरले. शिवसेनेतून 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेले आणि नव्याने शिंदे-फडणवीस सरकार बनविलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबतचे युती आपल्याला कधीच मान्य नव्हती, शिवसेनेने त्यांचे हिंदुत्व सोडले अशी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ही युती कधीच मान्य केली नसती. असे देखील शिवसेनेतून बाहेर पडलेले अनेक नेते म्हणत आहेत. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. ज्या शरद पवारांवर आज टीका केली जाते त्या पवारांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षविरहीत राजकीय संबंध कसे होते हे यातून स्पष्ट होते.

शिवसेना फुटल्यानंतर आज ज्या ठाकरे-शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची चर्चा सुरु आहे त्या पार्श्वभूमीवरील हे फोटो 1982 च्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याचे आहेत, जेव्हा शरद पवार अन जॉर्ज फर्नाडिस यांनी उपस्थित शिवसैनिकासमोर भाषणे देखील केली होती.

बाळासाहेब अन शरद पवारांचे नाते अगदी मैत्रीचे होते. राजकीय जीवनात बाळासाहेबांनी अनेकदा शरद पवारांवर जहरी टीका केल्या पण कधी शरद पवारांनी त्यांना तसे प्रत्युत्तर दिले नाही. वैयत्तिक जीवनात त्यांनी मैत्री फार जोपासली.

शरद पवारांना मीनाताईच्या हातचे जेवण आवडायचे ते धडक मातोश्रीवर जात, बाळासाहेब ‘शरद बाबू’ असं म्हणायचे.

2006 साली सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीने राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली, बाळासाहेबांना हे बातम्यातून समजले. तेव्हा त्यांनी फोन करून शरद पवारांना आपली नाराजगी सुनावली, “शरदबाबू, तुम्ही मला कळवले नाही सुप्रिया राज्यसभेला उभी राहतेय ते? माझ्या समोर वाढलेली पोरं ती, तुम्हाला वाटलं नाही मला सांगाव. सुप्रिया हि माझीच लेक आहे, हि निवडणूक बिनविरोध होईल. या पुढे असं करू नका” पुढे सुप्रिया ताई राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्या.

राजकारणात एकमेकावर टीका होत राहिल्या पण मैत्रीचे बंध कधी तुटले नाहीत. राज्यसभेला मुलीला मदत करणाऱ्या बाळासाहेबांच्या मुलाला शरद पवारांनी मुख्यमंत्री करून बाळासाहेबांच्या मदतीची परतफेड केल्याचेदेखील म्हटले जाते. राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो, असे नेहमी म्हटले जाते मात्र राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरीदेखील तात्वीक मतभेद बाजुल निखळ मैत्री जोपासणारे आजही अनेक नेते राजकारणात आहे.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 152
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.