Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तंत्रनिकेतनचे शिक्षण आता मराठीमध्ये : मंत्री पाटील
शिक्षण

तंत्रनिकेतनचे शिक्षण आता मराठीमध्ये : मंत्री पाटील

यापुढे पारंपारिक शिक्षणाऐवजी कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे यापुढे पारंपारिक शिक्षणाऐवजी कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य राहणार आहे. नव्या धोरणानुसार यापुढे पॉलिटेक्निकचे (तंत्रनिकेतन) शिक्षण मातृभाषेत दिले जाणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित लघु उद्योग भारतीच्यावतीने आयोजित इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. औद्योगिक क्षेत्रात संशोधन करणार्‍या शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक संस्थांना यावेळी गौरविण्यात आले. मंत्री पाटील म्हणाले, देशात आता औद्योगिक क्रांती घडू लागली आहे, या क्रांतीचा वेग वाढवायचा असेल तर संशोधनाला चालना देणे गरजेचे आहे. संशोधनवृत्ती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान, वाणिज्य, कला शाखेचे शिक्षण घेऊन उपयोग नाही, तर शिक्षण पद्धतीत बदल आवश्यक असल्याने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पाऊल उचलले असून डिसेंबरअखेर पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून करण्यात येईल. राज्यात या धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षाची अध्ययन सामुग्री मराठीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षकांना आवश्यक उपकरण उपलब्ध करून देणार असून त्यांनी इंग्रजीतून शिकवले तरी विद्यार्थ्यांना ते मातृभाषेतून समजणार आहे.

३१ हजार विद्यार्थ्यांनी निवडला मातृभाषेचा पर्याय
राज्यातील ३५० पॉलिटेक्निक महाविद्यालयांपैकी १७१ महाविद्यालयांमधून ३१ हजार विद्यार्थ्यांनी मातृभाषेचा पर्याय निवडला आहे. सरकारच्या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेता येणे शक्य होणार असल्याने यंदा प्रवेश वाढतील. २०१७ मध्ये पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये केवळ ४० टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येत होती, मात्र आता शंभर टक्के प्रवेश पूर्ण होतात.
डॉ. अभय वाघ
तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 117
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विजयादशमीच्या मंगलपर्वानिमित्त संगमनेरमधील अकोले रोडवरील मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये मंगळवारी, (२० ऑक्टोंबर)…

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.