Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार बाळासाहेब थोरातांनी केले त्या कुटूंबियांचे सांत्वन
सामाजिक

आमदार बाळासाहेब थोरातांनी केले त्या कुटूंबियांचे सांत्वन

पाण्यात उतरलेल्या वीज प्रवाहामुळे झाला होता चार भावडांचा मृत्यू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

पठार भागातील खंदरमाळवाडी येथील वांदरकडा येथील मृत झालेल्या चार भावडांच्या कुटूंबियांचे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी त्यांच्या घरी जाऊन भेट घेत या कुटूंबियांचे सांत्वन केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्यावतीने त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथे विजेचा धक्का बसून चार भावडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरात येताच बर्डे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, जि. प. सभापती मीरा शेटे, जि. प. सदस्य अजय फटांगरे, सरपंच शिवाजी फणसे, प्रकाश भालके, सुनंदाताई भागवत, जयराम ढेरंगे, गौरव डोंगरे, गणेश कजबे आदींसह खंदरमाळवाडी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

थोरात म्हणाले की,  

चार बालकांचा असा मृत्यू होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. ही घटना सर्वांचे हृदय हेलकावून टाकणारी आहे. आम्ही सर्वजण या कुटुंबाबरोबर आहोत. ज्या कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाला आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच या घटनेचा सखोल तपास व्हावा. विशेषत: पावसाळ्यामध्ये दरवर्षी महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अशा घटना घडत असतात. त्यामुळे अशा घटना पुन्हा-पुन्हा होऊ नये सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असून याकडे वीज मंडळांने गांभीर्याने पाहत यावर ठोस कृती आराखडा करावा. तसेच सरकारच्यावतीने या दोन्ही कुटुंबांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 106
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.