Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अंधेरी पूर्व मध्ये भाजपने उमेदवार देऊ नये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली मागणी
राजकारण

अंधेरी पूर्व मध्ये भाजपने उमेदवार देऊ नये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली मागणी

"ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं'' राज ठाकरे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) मध्ये पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवार देऊ नये येथून ‘ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं’ अशा आशयाचं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दिवंगत आमदार लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भारतीय जनता पक्षाने मुरजी पटेल यांना लटके यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांनी या पत्राद्वारे उद्धव ठाकरे यांना समर्थन दिल्याचे बोलले जाते. सध्या सुरू असलेल्या शिवसेनेच्या दोन गटातील वादासंदर्भात महाराष्ट्र सैनिकांनी कोणतेही भाष्य करू नये, योग्य वेळ आल्यावर मी यासंदर्भात बोलेल, असे ठाकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे ठाकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार देऊ नये अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.

राज ठाकरे पत्राद्वारे नेमके काय म्हणाले

प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र!
एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे.
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोट-निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.
माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.
मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न
लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल.
आपला मित्र,
राज ठाकरे

दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. फडणवीस म्हणाले, राज ठाकरेंनी चांगल्या भावनेने पत्र पाठवले. या जागेवर भाजपने उमेदवार दिला आहे. त्यामुळे हा निर्णय माझा एकट्याचा असू शकत नाही. याबाबत पक्षाच्या नेत्यांशीदेखील चर्चा करावी लागेल. सत्तेतील मित्रपक्ष शिंदे गटाशी (बाळासाहेबांची शिवसेना) बोलावं लागेल असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 301
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.