Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कौशल्य निर्मितीत सुतारांनी गिरविले आर्थिक नियोजनाचे धडे
सामाजिक

कौशल्य निर्मितीत सुतारांनी गिरविले आर्थिक नियोजनाचे धडे

म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या माध्यमातून सामान्य व्यक्ती ही करोडपती होऊ शकतो - सुनील कडलग
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/10/2022Updated:17/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंडाच्या एसआयपीद्वारे देखील सामान्य व्यक्ती करोडपती होऊ शकतो. अशी स्वप्न आपण पाहिली पाहिजेत, असे प्रतिपादन म्युच्युअल फंड वितरक व कडलग इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कडलग यांनी केले. भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या निर्देशानुसार येथील श्री सिद्धिविनायक कार्पोरेशनतर्फे आयोजित सुतारांसाठीच्या कौशल्य निर्मिती ‘संवाद ‘ प्रशिक्षण कार्यशाळेत सुतारांनी आर्थिक नियोजनाचे धडे गिरविले. ‘भारतीय अर्थव्यवस्था व सामान्य गुंतवणूकदारांचे संपत्ति निर्माण’ या विषयावर कडलग यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सिद्धिविनायकचे संचालक संदीप चोथवे तर अतिथी म्हणून ग्रीन प्लाईचे व्यवस्थापक राहुल साहू, मेरीनो लैमिनेट्सचे शाखा व्यवस्थापक जितेन्द्र पाटील, यूनिकोलचे नायर उपस्थित होते. कडलग म्हणाले, सद्यस्थितीत भारत ही जागतिक पातळीवरील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. २०२९ मध्ये भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकाची होण्याची श्यक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संपत्ती निर्माणासाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंड एसआयपीच्या व एकरकमी गुंतवणुकीच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीही करोडपती होऊ शकते. मात्र, ही स्वप्न आपण पाहिली पाहिजेत. २०२१-२२ मध्ये लोकांची बचत २०२०-२१ च्या तुलनेत १९ टक्क्यांनी घटलेली असतानाही म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मात्र तब्बल १५० टक्क्यांनी वाढली आहे. म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून संपत्ती निर्माण होत असल्याने व बँकेमधील मुदत ठेवीचे दर घसरलेले असल्याने सामान्य गुंतवणूकदारही म्युच्युअल फंडाकडे आकर्षित होत आहेत. भारतीय शेअर बाजारातून परकीय गुंतवणूकदारांची सातत्याने विक्री, जागतिक बाजारातील रुपयाची घसरण, महागाईमध्ये झालेली वाढ असे असूनसुद्धा किरकोळ गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांवरील विश्वास वाढत आहे. जूनमध्ये एसआयपी खात्यांची संख्या ५.५५ कोटींच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचलेली आहेत. एवढेच नव्हे तर एसआयपीच्या माध्यमातून येणारी गुंतवणूक १२,२७६ त्यांच्या कोटी रुपयांच्या उच्च पातळीवर पोहोचली आहे. जगात आर्थिक मंदी मंदावत असतानाही भारत ‘ब्राईट स्पॉट’ ठरत आहे असे प्रशंसोदगार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने काढले आहेत. सामान्य गुंतवणूकदार एसआयपीच्या माध्यमातून महिन्याला केवळ शंभर रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करू शकतो. सूत्रसंचालन प्रा. डॉ. जितेंद्र पाटील यांनी तर आभार ग्रीन प्लायचे निलेश जोशी यांनी व्यक्त केले.

आपले कौशल्य आणि कष्टाद्वारे सुतार चांगल्या प्रमाणात पैसा कमवत आहेत. मात्र त्या पैशाचे आर्थिक व्यवस्थापनाचे ज्ञान नसल्यामुळे भविष्यात त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संदीप चोथवे, संचालक, सिद्धिविनायक.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 97
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.