Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विखे-लहामटे-तांबे-थोरात यांच्या पाठोपाठ आता अजित पवारही बर्डे कुटुंबियांच्या सांत्वनाला
सामाजिक

विखे-लहामटे-तांबे-थोरात यांच्या पाठोपाठ आता अजित पवारही बर्डे कुटुंबियांच्या सांत्वनाला

बड्या राजकीय नेत्यांच्या भेटीनंतरही बर्डे कुटुंबीय अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/10/2022Updated:17/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
पाण्यात उतरलेल्या वीज प्रवाहामुळे चार भावंडांचा मृत्यू झाल्यानंतर बर्डे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांचा ओघ सुरू झाला आहे. सोमवारी (ता. १७ ऑक्टोंबर) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील अकलापुरमध्ये जाऊन या कुटुंबियांचे सांत्वन केले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी तात्काळ मोबाईलवरून संवाद साधला. त्यानंतर या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथे तुटून पाण्यात पडलेल्या विज वाहिनीचा प्रवाह पाण्यात उतरल्याने विजेचा धक्का बसून अनिकेत अरुण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे, विराज अजित बर्डे या चार भावंडांचा दुर्दैवी मृत्यूची झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तालुक्यातील हा भाग ज्या मतदारसंघात येतो त्या भागाचे आमदार डॉ. किरण लहामटे, पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात या बड्या नेत्यांसह अनेकांनी आत्तापर्यंत या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले, मदतीच्या घोषणा केल्या. मात्र या कुटुंबीयापर्यंत अद्याप कोणतीही मदत पोहोचली नसल्याची माहिती मिळते. अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार किरण लहामटे यांच्यासह सोमवारी या ठिकाणी भेट देत बर्डे कुटुंबांचे सांत्वन केले. घटनेची माहिती घेत यावेळी त्यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी संपर्क करत या कुटुंबीयांना ‘शबरी’ योजनेतून दोन घरकुले देण्याची केली मागणी.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, उपकार्यकारी अभियंता श्री. पाटील, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष कपील पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, डॉ. दत्तात्रय हांडे, अकलापूरचे माजी उपसरपंच व विश्वस्त संतोष देवकर, विश्वस्त शिवाजी तळेकर, संपत आभाळे, अशोक वाघ, आंबी खालसाचे सरपंच बाळासाहेब ढोले, विकास शेळके, सुहास वाळुंज, गौरव डोंगरे, बाळासाहेब कुर्‍हाडे, रघुनाथ आभाळे, पांडुरंग कुरकुटे, घारगावचे माजी सरपंच सुरेश गाडेकर, हॉटेल लक्ष्मीचे मालक आमीर शेख, संदीप आभाळे, विशाल वाणी, मुन्ना शेख, बाळासाहेब कुरकुटे, दिनेश पावडे आदी उपस्थित होते.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 120
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.