Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी
आंदोलन

संगमनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

सरसकट पंचनामे करून तातडीच्या मदतीसाठी ठिय्या
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन सह मोठ्या प्रमाणात सर्वच पिके वाया गेली आहेत. शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना मदत जाहीर करण्यात यावी. तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या कार्यालयाबाहेर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांच्या सरकार विरोधी घोषणांनी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांना दिले. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे, निखिल पापडेजा, नितीन अभंग, संतोष हासे, विजय रहाणे, राजेंद्र चकोर, आनंद वर्पे, बादशहा वाळुंज, जावेद शेख, जयराम ढेरंगे, संतोष नागरे, सुनील कडलग, रामनाथ कुऱ्हे, तात्या कुटे, राजेंद्र खेमनर, शहाजी खेमनर, शिवाजी गोसावी, अक्षय दिघे, राजेंद्र थोरात, ऋतिक राऊत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका एक परिवार म्हणून राज्यात परिचित आहे. यावर्षी तालुक्यात सर्वत्र चांगला आणि जोराचा पाऊस झाला आहे. यामुळे सोयाबीनसह सर्व पिके वाया गेले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत मिळायला हवी. तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.

इंद्रजीत थोरात म्हणाले, नुकसानग्रस्त शेती पिकांचे सरसकट पंचनामे करावेत ही आमची मुख्य मागणी आहे. सरकारने केवळ घोषणा न करता आवश्यक ती मदत तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली पाहिजे.

काय होती आंदोलकांची मागणी
संगमनेर तालुक्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात आलेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे देखील नुकसान झाले. खरिपाची पिके वाया गेली. याचा मोठा आर्थिक फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने तालुक्यातील सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी काँग्रेसने हे आंदोलन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 120
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.