Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राजहंस दूध संघाकडून दीपावलीनिमीत्त ३३ कोटी रुपये बँकेत वर्ग
शेती व सहकार

राजहंस दूध संघाकडून दीपावलीनिमीत्त ३३ कोटी रुपये बँकेत वर्ग

दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांची माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनते व राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्यावतीने दीपावलीनिमित्त दूध फरक, दुध पेमेंट, दूध वाहतूक ठेकेदारांचे पेमेंट व अनामत, कामगारांचा बोनस आणि पगारापोटी ३३ कोटी रुपये बँकेत वर्ग केले आहे. अशी माहिती दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली.
देशमुख म्हणाले, दूध संघाकडून दरवर्षी चांगल्या प्रतीच्या दूध पुरवठ्यावर जास्तीत जास्त दूध फरक अदा करण्यात येतो. सरासरी ३५ रुपये भाव, दूध संघाचे रिबेट व स्थानिक संस्थांचे रिबेट म्हणून दूध उत्पादकास सर्वाधिक भाव राजहंस दूध संघाकडून मिळत असतो. १६ ऑक्टोबर २०२२ पासून एक रुपया दूध दरात दरवाढ करण्यात आली असून आता ३६ रुपये लिटर प्रमाणे दूध उत्पादकांना भाव मिळणार आहे. याचबरोबर मागील वर्षीसाठी प्रतिलिटर एक रुपया रिबीट देण्यात आले आहे.

राजहंस दूध संघाने अत्यंत अडचणीच्या कोरोना काळात एकही दिवस बंद न घेता दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. याचबरोबर गाईंच्या आरोग्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. नुकत्याच आलेल्या लंम्पी आजारात सर्वत्र मोफत लसीकरण संघामार्फत करण्यात आले आहेत. याचबरोबर हर्डमन, राजहंस प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर या मार्फत विविध योजना राबवल्या जात असून संघामार्फत मूरघास, सामूहिक जंत व गोचीड निर्मलन, कावीळ लसीकरण, मॉडर्न डेअरी फार्म, राजहंस मिनरल मिक्स्चर, पशुखाद्य इत्यादींसाठी काही प्रमाणात अनुदान दिले जात आहे.

तसेच मुक्त संचार गोठा, मॉडर्न डेअरी या योजना राबविण्यात येत आहेत. लंपीच्या आजारावर औषधे १०० टक्के अनुदानावर दूध संघाने पुरवली आहेत. उच्च वंशावळ असणाऱ्या गाई तयार करण्यासाठी उच्च प्रतीचे सिमेंन्स गाय उत्पादकांना पुरविण्यात आले आहे. दूध संघाने सातत्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला.

दीपावलीनिमित्त दूध उत्पादक, कामगार यांना रिबेट व बोनस देण्याची परंपरा राखत ३३ कोटी रुपये बँकेत वर्ग केल्याबद्दल दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, संचालक आर. बी. राहणे, लक्ष्मणराव कुटे, भास्करराव सिनारे, विलासराव वर्पे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, प्रतिभाताई जोंधळे, मंदाताई नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, व्यवस्थापक गणपत शिंदे आदींचे दूध उत्पादकांनी आभार मानले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 135
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अमोल शेलकर- पुणे–नाशिक रेल्वे हा संगमनेरच्या विकासासाठी केवळ रेल्वेचा…

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.