Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » म्युच्युअल फंड चार-पाच वर्षात १०० लाख कोटीच्या घरात
सामाजिक

म्युच्युअल फंड चार-पाच वर्षात १०० लाख कोटीच्या घरात

गुंतवणूकदार संपत्ती निर्माण करतील : सुनील कडलग
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

म्युच्युअल फंडाला गुंतवणूकदारांची पसंती मिळत असल्याने त्यात गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. येत्या चार ते पाच वर्षांत हा उद्योग १०० लाख कोटींचा होईल आणि भारत शक्तीशाली अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असताना गुंतवणूकदार संपत्ति निर्माण करतील असा आशावाद आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञ सुनील कडलग यांनी व्यक्त केला.

घारगाव येथे साईनाथ उद्योग समूहाच्या दिपावली निमित्त आयोजित स्नेहबंध मेळाव्यात कडलग प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईनाथ उद्योग समूहाचे संस्थापक बजरंगशेठ वाकळे उपस्थित होते. प्रास्तविक भाषणात साईनाथ उद्योग समूहाचे संचालक सुदिप वाकळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. समाजातील प्रत्येक घटक अर्थसाक्षर झाल्यास जीवनातील समस्या दूर होतील व संपत्ती निर्माण होईल असे त्यांनी सांगितले.

कडलग म्हणाले, दिवसेंदिवस महागाई वाढत चालल्याने पैशांचे मूल्य कमी होत आहे. त्या तुलनेत संपत्ती निर्माण करण्यासाठी बचत व गुंतवणुकीतील फरक समजावून घेणे आवश्यक आहे. बँक मुदत ठेवीला त्यांनी धोकादायक सुरक्षित असे संबोधले. बँक मुदत ठेवी, पीपीएफ, रियल इस्टेट, सोने, शेअर्स, म्युच्युअल फंडस् आदी गुंतवणूक पर्यायांची तुलना व महत्व, त्यांच्या मर्यादा तसेच गुंतविलेल्या पैशांचा योग्य परतावा मिळण्यासाठी टाळावयाच्या चुका यासंबधी त्यांनी फरक स्पष्ट केले.

विमा संरक्षणासाठी टर्म इन्शुरन्स, आपत्कालीन वैद्यकीय खर्चाच्या तरतुदीसाठी वैद्यकिय विमा, वैयक्तिक अपघात विमा कवच, आपत्कालिन निधीची तरतूद आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माणसाठी सल्लागाराच्या मार्गदर्शनाने गुंतवणूक असे पाच मूलभूत मंत्र त्यांनी उपस्थितांना सांगितले. जगाचे गुंतवणूक गुरु वॉरेन बफे यांचे विचारही त्यांनी स्पष्ट केले.

सद्यस्थितीत सप्टेंबर २०२२ अखेर ३९.८७ लाख कोटींच्या संपत्तीचे व्यवस्थापन करत असलेला म्युच्युअल फंड उद्योग हा येत्या चार – पाच वर्षांत १०० लाख कोटींचा होईल व जगात पाचव्या क्रमांकाची असलेली भारतीय अर्थव्यवस्था ही २०२९ पर्यंत तिसऱ्या क्रमांकाची असेल असा आशावाद व्यक्त करत प्रगल्भ लोकशाही, स्थैर्य  व  लोकसंख्येच्या तुलनेत ६५ टक्के असलेली युवकांची संख्या ही भारताची बलस्थाने आहेत. भारतीय बँकांमध्ये आजही १६० लाख कोटींच्या बचत ठेवी आहेत. भविष्यात त्या म्युच्युअल फंडात वळतील असेही ते शेवटी म्हणाले.

यावेळी संदिप फटांगरे, सुभाष राहणे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन फटांगरे यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 182
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अमोल शेलकर- पुणे–नाशिक रेल्वे हा संगमनेरच्या विकासासाठी केवळ रेल्वेचा…

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.