Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यातील ‘या’ जाणत्या राजाने सहकारी साखर कारखानदारी संपवली
राजकारण

राज्यातील ‘या’ जाणत्या राजाने सहकारी साखर कारखानदारी संपवली

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांवर टीका
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
जाणता राजा म्हणून ओळख असलेले शरद पवार केंद्रात कृषी मंत्री होते. या पवारांनीच राज्यातील सहकारी साखर कारखानदारी संपविली. अशी गंभीर टीका राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिकमध्ये केली.

नाशिक साखर कारखान्याच्या पळसे येथील गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मंत्री विखे बोलत होते.

विखे पाटील म्हणाले, पवार कृषिमंत्री असताना पंधरा वर्षांपूर्वीच साखर कारखानदारी संदर्भात निर्णय व्हायला हवे होते. इथेनॉल बद्दल धोरण राबवायला हवे होते. त्यांनी त्यावेळी योग्य धोरण राबविले असते तर आज राज्यातील साखर कारखाने कवडीमोल भावाने विकले गेले नसते. साखर कारखाने वाचू शकले असते मात्र ‘आम्हीच कारखाने बंद पाडायचे आणि आम्ही शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जायचे’, राज्यातील शेतकऱ्यांसमोर भाषण करायचे की मी कारखाना वाचवितो. अशा खोट्या बाता मारण्याचे धोरण पवार यांचे राहिले.

गत पंधरा वर्षात जे साखर कारखाने बंद पडले, ते कोणामुळे बंद पडलेत. बंद कारखान्यांची कवडीमोल दरात विक्री झाली. असे कारखाने नंतरच्या काळात खाजगी झाले. या माध्यमातून सहकारी साखर कारखाने खाजगी करण्याचं पेव महाराष्ट्रात कोणी आणल. असा सवाल करत साखर कारखानदारीत मागच्या वीस वर्षात तब्बल ८५ टक्के वाटा सहकारी साखर कारखान्यांचा होता, आज मितीस हा आकडा ५५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे साखर कारखानदारीचा हा व्यवसाय आता खाजगी कारखानदारांच्या हातात गेला आहे.

डबघाईला जाणारी ही साखर कारखानदारी वाचविण्याचे दायित्व ज्यांच्याकडे होते त्यांनी ते योग्य रीतीने निभावले का असादेखील सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,

“सरकार स्थापन होऊन तीन महिने झाले आहेत. आत्तापर्यंत शेतकरी, सर्वसामान्य जनता, कामगार, वारकरी यांच्याशी संबंधित बहात्तर निर्णय घेतले तर साडेतीनशेपेक्षा अधिक परिपत्रके काढले. आमच्या आधीचे सरकार ‘वर्क फ्रॉम होम’ होते, तर आताचे आमचे सरकार ‘विदाऊट होम’ असून तात्काळ निर्णय घेणारे आणि अंमलबजावणी करणारे आहे”.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 129
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.