Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्र्यांचे OSD असलेल्या संगमनेरच्या भूमिपुत्राला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी
गुन्हेगारी

मुख्यमंत्र्यांचे OSD असलेल्या संगमनेरच्या भूमिपुत्राला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी

डॉ. राहुल गेठे नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) असलेले संगमनेरचे भूमिपुत्र डॉ. राहुल गेठे यांना नक्षलवाद्याकडून जीवे मारण्याचे धमकी मिळाली आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

डॉक्टर देठे यांना मिळालेल्या धमकी पत्रामध्ये म्हटले आहे की,

जय लाल सलाम, जय किसान

डॉक्टर राहुल गेठे को आखरी चेतावणी…

एकनाथ शिंदे का ऑफिसर डॉक्टर राहुल गेठे बहुत उड रहा है. हमारा नुकसान गडचिरोली मे बहुत कर रहा है. हम हमारे भाईयों का बदला जलद ही लेने वाले है. उसकी मौत का एलान निकल चुका है. महाराष्ट्र सरकार को उसकी जबाबदारी जितना लेना हे ले लो.

जय नक्षलवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना तसेच सध्याही मुख्यमंत्रीपदी असताना गडचिरोली मध्ये त्यांचा विकास कामांचा वेग मोठा आहे. नक्षली चळवळीला अडचण ठरू शकणाऱ्या या कामांमुळे नक्षलवाद्यांमध्ये त्यांच्याबद्दल रोष आहे.गेल्या पाच वर्षापासून मुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी असलेले संगमनेरचे भूमिपुत्र डॉ. राहुल गेठे आता नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे एका पत्राद्वारे स्पष्ट झाले आहे.

यामुळे राज्याचा गृह विभाग देखील सतर्क झाला आहे. डॉ. गेठे यांना नक्षलवाद्यांकडून पाठविण्यात आलेले पत्र प्राप्त झाले असून पोलीस यंत्रणा या संदर्भात अधिक माहिती घेत आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी गडचिरोलीमध्ये सुरू असलेल्या विकास कामांची जबाबदारी डॉक्टर गेठे यांच्यावर सोपविली आहे. या कामांमध्ये अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांकडून हे पत्र दिले गेले असावे अशी माहिती समोर येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील खाणकामाला याच्या काही दिवसात सुरुवात होणार असल्याची माहिती असून या कामासाठी स्थानिक ग्रामस्थांसह नक्षलवाद्यांचा देखील मोठा विरोध आहे.

लॉईड कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटची या ठिकाणी हत्या देखील करण्यात आली होती. त्यामुळे सुरजागडचे खाणकाम काही काळासाठी बंद करण्यात आले होते. मात्र आता हे काम पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्याकडून मिळालेल्या या पत्राला महत्त्व प्राप्त झाले असून प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असल्याची माहिती समजते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 157
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.