Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अंधेरी पूर्व पोट निवडणुक : अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांचा विजय
राजकारण

अंधेरी पूर्व पोट निवडणुक : अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांचा विजय

नोटाला मिळाली दुसऱ्या क्रमांकाची मते उर्वरित सहा अपक्षांपैकी एकही उमेदवार गाठू शकला नाही दोन हजारांचा पल्ला
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 6, 2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांनी विजय मिळविला आहे. विरोधकांनी उमेदवार दिला नसला तरी प्रतिष्ठेच्या बनविलेल्या ‘नोटा’ला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तर उर्वरित सहा अपक्ष उमेदवारांपैकी एकही उमेदवार दोन हजाराचा पल्ला गाठू शकला नाही.

शिवसेनेमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या बंडा नंतर अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक देशभर चर्चिली गेली. विविध कारणांमुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेतील फुटी नंतर प्रथमतः उद्धव ठाकरे गटाने हे मोठे यश मिळविले आहे.

आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. पोट निवडणुकीआधीच शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ही दावा केला होता. यामुळे शिवसेनेतील दोन्ही गटांमधील वाद न्यायालयात गेला असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवत दोन्ही गटाला नवीन चिन्ह आणि नाव दिले होते.

ठाकरे गटाने दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. पण, ऋतुजा या मुंबई महापालिकेत नोकरी करीत होत्या. निवडणूक लढविण्यासाठी त्यांना महापालिकेतील नोकरीचा राजीनामा देणे आवश्यक होते. त्यांनी तो दिला. पण, महापालिकेकडून तो स्विकारण्यात आला नाही. अखेर हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात गेले. तेव्हा न्यायालयाने राजीनामा मंजूर करण्याचे आदेश महापालिकेला दिले. त्यानंतर शेवटच्या दिवशी ऋतुजा यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.

शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटाने मात्र उमेदवार दिला नाही. त्यांनी त्यांचा मित्र पक्ष असलेल्या भाजपला पाठिंबा दिला. भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांना पत्र लिहिले. त्यात मागणी केली की ऋतुजा

यांना बिनविरोध निवडून द्यावे आणि आपला उमेदवार मागे घ्यावा. त्याची दखल घेत भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. मात्र, ठाकरे गटाला सहानुभूती मिळू नये तसेच पहिलाच मोठा विजय प्राप्त झाल्यास त्या गटाचे मनोबल वाढेल ही बाब लक्षात घेऊन राजकीयदृष्ट्या भाजपने उमेदवार मागे घेतला. भाजपने उमेदवारी मागे घेतली पण अन्य अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या उमेदवारांनी माघार न घेतल्याने ऋतुजा यांच्यासह रिंगणात एकूण ७ उमेदवार राहिले. परिणामी, या निवडणुक झाली. मतदारांच्या निरुत्साहामुळे केवळ ३१ टक्केच मतदान झाले.

दरम्यान, भाजपने उमेदवारी माघार घेतल्यानंतर प्रचार मात्र नोटाचा केल्याचे बोलले जात आहे. नोटाला सर्वाधिक मते मिळाली तर लटके यांच्या विजयाचा मार्गही अडचणीचा ठरु शकतो. त्यामुळे उघडपणे उमेदवार मागे घ्यायचा मात्र पडद्यामागे नोटाचा प्रचार करुन ठाकरे गटाच्या अडचणी वाढवायचा अशी रणनिती भाजपची असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला गेला होता. मात्र आज झालेल्या मतमोजणी नंतर लटके यांचा विजय झाला असून दुसऱ्या क्रमांकाचे मते नोटाला मिळाली.

उमेदवार निहाय पडलेली मते : 

श्रीमती ऋतुजा लटके – 66530 (विजयी)

बाला नाडार – 1515

मनोज नायक – 900

श्रीमती नीना खेडेकर – 1531

श्रीमती फरहाना सय्यद – 1093

मिलिंद कांबळे – 624

राजेश त्रिपाठी – 1571

नोटा – 12806

एकूण मते – 86570

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 120
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

By अनंत पांगारकरJuly 16, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: फेसबुकवरील आकर्षक जाहिरातीला भुलून जिओ कंपनीचा पेट्रोल पंप आणि त्याचा…

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

July 16, 2026

समरवीर देशमुखची राज्यस्तरीय कौशल्य चाचणीत चमकदार कामगिरी; बालेवाडीच्या क्रीडा प्रबोधिनीत मिळवला प्रवेश

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.