Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संपर्क प्रमुखांविरोधातील भूमिका भोवली; शिवसेना शहर प्रमुखासह आणखी तीन जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संपर्क प्रमुखांविरोधातील भूमिका भोवली; शिवसेना शहर प्रमुखासह आणखी तीन जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

एकमेकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह आता थेट पोलीस ठाण्यात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/11/2022Updated:07/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांची प्रतिमा जाळल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दात घोषणाबाजी करणाऱ्या शिवसेनेच्या शहरप्रमुखासह चार जणांविरोधात पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद जयवंत पवार, गुलाब पांडुरंग भोसले, अमोल त्रंबक कवडे आणि रवींद्र उर्फ पप्प्या नंदू कानकाटे यांचा समावेश आहे. या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर आला असून संगमनेर शिवसेनेत संपर्कप्रमुख बबन घोलप आणि जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे समर्थकांचे दोन गट निर्माण झाले आहे.

शिवसेना उत्तर नगर जिल्हा उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानाच्या कलम 500 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेची जुनी कार्यकारिणी रद्द करून नवीन कार्यकारिणीची निवड केली. त्याचा राग येऊन आरोपींनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख माजी न्याय मंत्री बबन घोलप यांचा निषेध करून बदनामीकारक घोषणा देऊन खोटे आरोप केले.

नेमके काय घडले होते

उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संपर्कप्रमुख बबन घोलप यांनी सुचविलेली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. कार्यकारिणीमध्ये जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या समर्थकांना वगळण्यात आल्याने संपर्कप्रमुख घोलप यांच्या विरोधात खेवरे समर्थकांनी आंदोलने केली. संगमनेरमध्ये देखील रायतेवाडी फाटा येथे हॉटेल संकेतमध्ये बैठक घेत घोलप यांचा निषेध करण्यात आला होता. तसेच जिल्हाप्रमुख खेवरे यांनी देखील मातोश्रीवर धाव घेत या कार्यकारिणीला विरोध दर्शविल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीला शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून स्थगिती देण्यात आली.

त्यानंतर संगमनेरमध्ये संपर्कप्रमुख घोलप यांच्या समर्थकांनी जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या प्रतिमेचे दहन केले होते. त्यामुळे खेवरे समर्थकांनी पोलीस उपाधीक्षकांची भेट घेत या आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे 16 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या पाठोपाठ उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी देखील दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेना शहर प्रमुखासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद आता नेमका काय वळण घेतो. हे त्या काही दिवसात स्पष्ट होईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 126
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.