Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक
राजकारण

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक

ट्विट करत म्हणाले; फाशी दिली तरी चालेल पण मी जे केलेले नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 जणांविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये वर्तक नगर पोलिसांनी आव्हाड यांना अटक केली आहे.

हर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखविणे असल्याचा आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही कार्यकर्त्यांसह सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान विवियाना मॉल मधील चित्रपटाचा शोध बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकांने शो बंद पाडल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मागितले होते तसेच कोण जितेंद्र आव्हाड अशी विचारणा केली होती. यावेळी संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी ठाण्याच्या वर्तक नगर पोलीस ठाण्यामध्ये आमदार आव्हाड यांच्यासह शंभर कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तीन दिवसाचा कालावधी उरकल्यावर आज वर्तक नगर पोलिसांनी आव्हाड यांना अटक केली आहे.

या संदर्भात स्वतः आव्हाड यांनी सलग तीन ट्विट करत माहिती दिली. ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले, दुपारी साधारण एक वाजता मला वर्तक नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असता त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करू शकत नाही. वरून आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल.

याशिवाय तिसऱ्या ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे की, हा पॉलिसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. मी जे केलेले नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.

आव्हाडांच्या अटकेचे स्वागत; महाराष्ट्रभर जेलभरो आंदोलन करणार

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. तसेच, या अटकेचे मी स्वागत करते असेही त्यांनी म्हटले आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे देवाप्रमाणे आहेत. जर शिवाजी महाराजांबद्दल कोणी चुकीचे सांगत असेल आणि त्याविरुद्ध जितेंद्र आव्हाड आवाज उठवत असतील, त्यामुळेच हे सरकार त्यांना तुरुंगात टाकत असेल तर आम्ही सगळेच तुरुंगात जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन करू. महाराष्ट्राचे आन-बान शान आणि आमचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराजांबद्दल जे चुकीचे दाखवण्यात येत आहे, त्याचं जर हे सरकार समर्थन करत असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावे असे देखील सुळे म्हणाल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 110
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.