Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुंबईतील अनेक प्रकल्प उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलाने रोखल्याची भाजपची टीका
राजकारण

मुंबईतील अनेक प्रकल्प उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलाने रोखल्याची भाजपची टीका

महापालिकेतून येणारे खोके बंद झाल्याने ठाकरे अस्वस्थ झाल्याचे भाजपाचे मुंबई प्रभारी, आमदार अतुल भातखळकर यांचे टीकास्त्र
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी करून मुख्यमंत्री पद मिळविले. मुंबईतील अनेक प्रकल्प रोखण्याचे काम त्यांनी आणि त्यांच्या मुलाने केले. कोणताही व्यवसाय न करता ठाकरेंची करोडची संपत्ती कशी असा सवाल करत महापालिकेतून येणारे खोके बंद झाल्याने ते अस्वस्थ झाल्याची टीका भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर मुंबईचा’ या अभियानांतर्गत शनिवारी झालेल्या कांदिवलीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सावंत उपस्थित होते.

भातखळकर म्हणाले, स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंदू समाज आणि मुंबईतील जनतेत फूट पाडण्याचे घाणेरडे काम सुरु केले आहे. त्यांनी मुंबईच्या विकासात खोडा घालण्याचे काम केले असून मुंबईच्या विकासाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच आहे. ठाकरेंचे कर्तुत्व असे आहे की त्यांच्या नावातून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव हटवायला हवे. अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटविण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने केले मात्र याची बातमी सामनामध्ये आली नाही.

मुंबईतील मेट्रोच्या वाढत्या खर्चाला केवळ उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा एकदाही घराबाहेर पडले नाही. अशावेळी केवळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घराबाहेर पडून समाजासाठी काम करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खरे डॉक्टर असून त्यांच्यामुळे अडीच वर्ष घरात बसलेले आता घराबाहेर पडू लागले आहेत. आता त्यांचे आजारपण कुठे गेले असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला.

खासदार शेट्टी म्हणाले, महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी आवाज उठविला आहे. मुंबई महापालिका फायद्यात येण्यामागे भारतीय जनता पक्षाचे योगदान आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी महापालिकेतील टेंडर सिस्टीम बदलावे लागणार असून भाजपच्या सदस्यांनी महापालिकेत शिवसेनेवर अंकुश ठेवण्याचे काम केले आहे.

आमदार पाटील म्हणाले, मुंबई महापालिकेत तीन लाख करोड रुपयांचा गैरव्यवहार केवळ एका कुटुंबामुळे झाला. घराणेशाही चा फायदा एका विशिष्ट घराण्याला झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 127
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.