Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलिसांची भीती संपली; शहरात गजबजलेल्या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील गंठण लांबविले
गुन्हेगारी

पोलिसांची भीती संपली; शहरात गजबजलेल्या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील गंठण लांबविले

संगमनेरात वावरणे महिलांसाठी बनले धोकादायक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेरमध्ये पोलीस यंत्रणेचा धाक संपुष्टात आल्याने शहरातील गजबजलेल्या ठिकाणी अकोल्या नाका परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण लंपास केले आहे. चोरटे पसार झाले असून त्यांचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

गुन्हेगारांवर धाक निर्माण करण्याचे काम पोलीस यंत्रणेचे असते मात्र शहरात गेल्या काही दिवसांपासून हे चित्र दुर्मिळ बनले आहे शहरातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाली असून दररोज दुचाकी चोऱ्या सुरू असतानाच आता महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील धूम स्टाईलने लंपास करण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. वरवर हे प्रकार किरकोळ दिसत असले तरी पोलीस यंत्रणा मात्र याबाबतीत फारशी गंभीर दिसत नाही.

सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या अकोले नाका येथे अकोले येथील रुग्णालयात जाण्यासाठी मनीषा राधाकिसन आभाळे ही महिला पुलाजवळून जात असताना समोरून चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या मोटरसायकलवर हेल्मेट घालून मागे बसलेल्या अज्ञात व्यक्तीने या महिलेच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे गंठण ओढून नेले.

गळ्यातून गंठण दुचाकी वरील व्यक्तीने ओढल्याचे लक्षात येताच महिलेने आरडाओरडा केला. त्यामुळे तेथे जमलेल्या काही जणांनी चोरट्यांचा पाठलाग देखील करण्याचा प्रयत्न केला मात्र, ते यशस्वी ठरले नाही. चोरटे गंठण घेऊन पसार झाले. दरम्यान यासंदर्भात संबंधित महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या दागिने लंपास करण्याच्या घटना घडल्या आहेत. क्वचित एखादा अपवाद वगळता यातील गुन्हेगार शोधण्यास पोलीस अयशस्वी ठरले आहेत.

संगमनेर शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याचा कंट्रोल देखील शहर पोलीस ठाण्यात आहे. मात्र अशा प्रकारच्या गुन्ह्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फारशी मदत झाल्याचे दिसत नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 131
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.