Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्रात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा यशस्वी; पटोले-थोरात यांनी मानले पत्राद्वारे आभार!
राजकारण

महाराष्ट्रात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा यशस्वी; पटोले-थोरात यांनी मानले पत्राद्वारे आभार!

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व भारत जोडो यात्रा समन्वयक बाळासाहेब थोरात यांचे एकत्रित पत्र
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/11/2022Updated:25/11/2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर निघालेले भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मध्ये यशस्वी ठरली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भारत जोडो यात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात यांनी यात्रा यशस्वी करणाऱ्या सर्वांचे एका पत्राद्वारे आभार मानले आहेत.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यात अनेकांचे सहकार्य लाभले. ही ऐतिहासिक पदयात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनता उत्स्फूर्तपणे राबत १४ दिवसाच्या या कालखंडात सर्वांनी यात्रा यशस्वीतेसाठी मोठे सहकार्य केले. राहुलजींबरोबर पायी चालत आपल्या समस्या, व्यथा, वेदना सांगितल्या व राहुलजी यांनीही त्या ऐकून घेतल्या.

भारतयात्रींच्या आदरातिथ्यात आपण कुठेही कमी पडलो नाही. ही यात्रा यशस्वी करून देशाला एक संदेश देण्यात आपणा सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व भारत जोडो यात्रेचे समन्वय बाळासाहेब थोरात यांनी खुले पत्र लिहून सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

काय आहे पटोले थोरात यांनी लिहिलेले काँग्रेसचे आभार पत्र

भारत जोडो यात्रा यशस्वी करणाऱ्या सर्वांचे आभार !

नमस्कार,

मा. खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली आणि दोन महिन्यानंतर ७ नोव्हेंबरला या पदयात्रेने नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून महाराष्ट्रात प्रवेश केला. देगलूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यासमोर हजारो लोकांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांना अभिवादन करून राहुलजी व भारतयात्रींनी हजारो मशाली हाती घेत क्रांतीची मशाल पेटवली.

मंदिर, मशिद, बौद्ध विहार, गुरुद्वारामध्ये जाऊन भारताची खरी ओळख असलेल्या विविधततेली एकतेचे दर्शन केले. देगलूर येथून सुरु झालेला महाराष्ट्रातील पदयात्रेचा हा प्रवास बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे संपला. १४ दिवासांच्या या प्रवासात रस्त्याच्या दुतर्फा दररोज हजारो लोक जमा होऊन राहुलजी गांधी व भारतयात्रींची आतुरतेने वाट पहात असल्याचे चित्र दिसले. पहाटेच्या वेळी माता भगिणींनी यात्रा मार्गावर सडा टाकून रांगोळी काढून यात्रेचे स्वागत केले. या मार्गावर महाराष्ट्रातील विविध संस्कृतीचे दर्शन घडले. लोकांनी उस्फूर्तपणे येऊन भारत जोडो यात्रेत आपले योगदान दिले. नांदेड व शेगाव येथील जनसभेने तर गर्दीचे उच्चांक मोडले, विशेषतः शेगाव येथे जमलेला लाखोंचा जनसमुदाय परिवर्तनाचे संकेत देऊन गेला. सभास्थळ भरगच्च भरले होतेच पण सभास्थळाच्या आजूबाजूचा परिसरही लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता. ही फक्त सभेची गर्दी नव्हती तर इतिहास घडवणाऱ्या एका महत्वपूर्ण घटनेचे ते साक्षीदार झाले.

राहुलजी गांधी यांच्या बरोबर चालणाऱ्या सर्व भारतयात्रींचे आदरातिथ्य करण्यात महाराष्ट्राने कसलीही कमतरता ठेवली नाही. दररोज हजारो लोकांच्या राहण्याची, त्यांच्या जेवणाची, विश्रांतीची, औषधोपचारांची व्यवस्थीतपणे काळजी घेतली. आपण सढळ हस्ते सेवाकार्यात सहभागी झालात. याकामी हजारो लोक झटले, रस्त्यांच्या कडेला उभे राहून भारतयात्रींना फळे, पाणी, चहा देण्याचे काम स्वच्छेने केले. भारत जोडो यात्रा ही आपल्याच घरचे कार्य आहे असे समजून हजारो ज्ञात-अज्ञात हातांनी सहभागी होत आपापल्या परिने योगदान दिले.

‘अतिथी देवो भव’ची महाराष्ट्राला थोर परंपरा लाभलेली आहे. पंढरपुरच्या विठुरायाला भेटण्यासाठी दरवर्षी जशा पालख्या निघतात व यातील वारकऱ्यांचे स्वागत व आदरातिथ्य मराठी माणूस करतो त्याच पवित्र भावनेचे दर्शन या पदयात्रेतही झाले, हीच महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा आहे. भारतयात्रींच्या पाहुणचारात आपण तसुभरही कमी पडू दिले नाही. भारत जोडो यात्रेच्या या महायज्ञात प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाला एक संदेश दिला आहे. ही पदयात्रा यशस्वीपणे पार पाडण्यात महाराष्ट्रातील जनतेसोबतच अनेकांचे सहकार्य लाभले, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

भारत जोडो यात्रेला भरभरून प्रतिसाद देणा-या राज्यातील जनतेचे मन:पूर्वक आभार! यात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. राहुलजींनी सर्वांचे कौतुक करून उत्कृष्ठ आयोजनासाठी A+ ग्रेड दिला आहे. सर्वांचे मन:पूर्वक आभार!#BharatJodoYatra pic.twitter.com/ODhnB03BrO

— Balasaheb Thorat (@bb_thorat) November 25, 2022

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 119
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.