महाराष्ट्र संवाद न्यूज
हळूहळू सगळेच राज्य समान नागरी कायदा लागू करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील यासाठी योग्य वेळी विचार करू, असं सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी बाबत व्यक्त केले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस गुजरातमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस म्हणाले, उत्तराखंडमध्ये देखील हा कायदा लागू करण्यात येणार आहे. हिमाचल आणि गुजरात देखील करणार आहे. मला वाटतं हळूहळू सगळेच राज्य हे करणार आहेत. मात्र आज मी याबद्दल अधिकृत घोषणा करू शकत नाही. कारण अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असतो, असेदेखील ते म्हणाले.
संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. काही कारणांमुळे आपल्या देशात हे होऊ शकलं नाही. आता हा कायदा गोव्यात आहे. महाराष्ट्रही योग्य वेळी याचा विचार करणार.
समान नागरी कायदा बाबत काय म्हणाले केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
संपूर्ण देशात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे. याचा सर्व राज्यांनी विचार करावा. त्याची अंमलबजावणी करणारी राज्यं अभिनंदनास पात्र आहेत.


