Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » …तेव्हा महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांची यापुढे शिंदे-फडणवीस सरकारच्या राज्यात गय केली जाणार नाही
राजकारण

…तेव्हा महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांची यापुढे शिंदे-फडणवीस सरकारच्या राज्यात गय केली जाणार नाही

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा इशारा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मागील अडीच वर्षात महिलांच्या बाबतीत अनेक गैरप्रकार घडले होते. मात्र आता राज्यात शिंदे–फडणवीस यांचे सरकार असल्याने तेव्हा महिलांशी गैरवर्तन करणार्‍यांची यापुढे गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत महिलांशी संबंधित प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्यासाठी जलदगती न्यायालय सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

महिला मोर्च्याचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर वाघ प्रथमच ठाण्यात आल्या होत्या. ठाणे खोपट येथील भाजपा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही आता सत्ताधारी पक्षात आहोत. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली असून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना गोरगरिबापर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहोत. राज्यात पहिल्यांदा एका पुरुषाकडे महिला बालकल्याण मंत्रीपद आहे, हा अभिनव प्रयोग आहे, असेही त्या म्हणाल्या.

दुसर्‍या टप्प्यात होणार्‍या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपच्या चार महिला मंत्री असाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करत आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ तर विधानसभेत दोनशेहुन अधिक जागा जिंकण्याचे आमचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितले. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या महिलांमध्ये कर्तृत्व आहे त्यांना संधी मिळेल. अधिकाधिक भाजपच्या महिला आमदार विधानसभेत दिसून येतील असा दावाही त्यांनी यावेळी केला.

मंत्री संजय राठोड यांच्याबाबत चित्रा वाघ यांना विचारले असता, ‘तेंव्हा ती रस्त्याची लढाई होती. ती मी लढली होती. पण आता न्यायालयात प्रकरण आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे.’ असेही त्या म्हणाल्या. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य करणार्‍यांवर कारवाई व्हावी का ?असा प्रश्न चित्र वाघ यांना विचारला असता त्यांनी याचे उत्तर टाळत आमचे सरकार ऑनलाईन नाही तर ऑनफिल्ड सरकार आहे. तसेच फेसबुकवर नसून लोकांच्या चेहर्‍यावर हसू आणणारे आमचे सरकार आहे. असे सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 86
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात…

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.