महाराष्ट्र संवाद न्यूज
घरामध्ये चहा करणाऱ्या महिलेला पाठीमागून येत आरोपीने कवळी घालत तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच दुसऱ्या महिलेने संबंधित महिलेला चावा घेत लाथा बुक्क्याने मारहाण केल्याप्रकरणी तालुक्यातील नान्नज दुमाला येथील दोघा आरोपींविरोधात विनयभंग व मारहाणीचा संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपीने फिर्यादीच्या घरात अनाधिकाराने घुसत तिला पाठीमागून कवळी घालत शारीरिक संबंधाची मागणी केली फिर्यादीने आरोपीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फिर्यादीची साडी ओढून तिच्याशी पुन्हा लज्जास्पद वर्तन करण्यास सुरुवात केल्याने फिर्यादीने त्यास विरोध केला असता आरोपीने तिला शिवीगाळ करत लाथा बुक्क्याने मारहाण केली.
फिर्यादीच्या मुलीचा आरडाओरडा ऐकून तेथे आलेल्या दुसऱ्या महिला आरोपीने फिर्यादीच्या हनुवटीवर चावा घेत तिला लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच झालेला प्रकार तुझ्या आई-वडिलांसह कोणाला सांगितला तर जिवे मारून टाकेल, अशी धमकी दिली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून नान्नज दुमाला येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

