Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » असं काय आहे त्या व्हिडिओमध्ये की, ज्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केलेला व्हिडिओ चर्चेत
राजकारण

असं काय आहे त्या व्हिडिओमध्ये की, ज्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केलेला व्हिडिओ चर्चेत

थोरात यांच्या पाठोपाठ खासदार राहुल गांधींनीही ट्विट केला तो व्हिडिओ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/12/2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

माजी मंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरू आहे. खासदार राहुल गांधींचं चारित्र्यहनन कधीपासून आणि कुणी सुरू केलं?’ याबद्दलचा हा व्हिडिओ आहे.

भारत छोडो यात्रेच्या लोगोसह शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत राहुल गांधीचा राजकारणात प्रवेश झाल्यापासून कशा आणि कोणत्या घटना घडल्या याचीही माहिती देतानाच भाजपावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

व्हिडिओ सोबत थोरात यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की “राहुल गांधींची बदनामी आणि चारित्र्यहनन कधीपासून सुरू झालं आणि कुणी केलं? व्हिडीओ नक्की बघा असं म्हटलं आहे.

राहुल गांधींची बदनामी आणि चारित्र्यहनन कधीपासून सुरू झाले आणि कुणी केलं?
नक्की बघा.. pic.twitter.com/tlBAAcqZLP

— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 3, 2022

थोरात यांच्या पाठोपाठ स्वतः राहुल गांधी यांनीही आपल्या ट्विटर हँडलवर माझ्या माध्यमांमधील प्रतिमेमागील सत्य जाणून घ्यायचं आहे का असं विचारत याच व्हिडीओची युट्यूब लिंक शेअर केली आहे.

ट्विटर वर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये स्वतः राहुल गांधी यांनीच माहिती दिली आहे. ते म्हणतात, “जेव्हा मी सुरुवातीला राजकारणात आलो तेव्हा साधारणपणे २००४ ते २००९ पर्यंत भारतातील सर्व माध्यमं माझं कौतुक करत होती. त्यानंतर मी दोन मुद्दे उपस्थित केले. त्यातील एक नियामगिरीचा प्रश्न होता आणि दुसरा भट्टा-पर्सोलचा प्रश्न होता. त्यावेळी मी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत मजबुतीने उभी राहील असं म्हटलं.” “ज्या क्षणी मी हे जमिनीचे प्रश्न उपस्थित केले आणि गरिबांच्या अधिकारासाठी आवाज उंचावला त्या क्षणी माध्यमांमध्ये माझं चारित्र्यहनन सुरू झालं. आम्ही आदिवासींसाठी पेसा कायदा आणला, वनाधिकार कायदा आणला, जमीन अधीकरण विधेयक आणलं आणि तेव्हापासून या सर्वांनी २४ तास माझ्याविरोधात लिहिणं सुरू केलं,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

ते म्हणतात, भारताची जी संपत्ती होती ती आम्ही राजा-महाराजांकडून देशातील जनतेकडे दिली. आता भाजपा त्याच्या उलटं करत आहे. आता या जनतेची संपत्ती त्यांच्याकडून ओरबाडून या राजा-महाराजांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील जनता, आदिवासी लोक, गरीब लोक एकत्र उभे राहिले, तर हे काम खूप सोपं आहे. मात्र, विखुरलेले राहिले तर हे काम अशक्य आहे.”

भाजपाने माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले. लोकांना वाटतं असं करणं माझ्यासाठी नुकसान करणारं आहे. मात्र, याचा माझ्यावर परिणाम होत नाही. सत्य कोणत्या ना कोणत्या स्वरुपात बाहेर येतंच. ते माझी प्रतिमा खराब करायला जेवढा खर्च करत आहेत, तेवढी ताकद ते मला देत आहेत. कारण सत्य झाकून ठेवलं जाऊ शकत नाही किंवा दडपलं जाऊ शकत नाही.

जर मी मोठ्या शक्तींच्या विरोधात लढत असेल, तर माझ्यावर व्यक्तिगत हल्ले होतील. त्यामुळे मला माहिती आहे की, जेव्हा माझ्यावर व्यक्तिगत हल्ले होतात तेव्हा मी योग्य काम करत आहे, योग्य दिशेने जात आहे. हा एक प्रकारे माझा गुरू आहे. हा गुरू मला कोठे जायचं हे सांगतो. त्यामुळे मी या लढाईत पुढे जात आहे आणि पुढे जातोय तर सगळं योग्य आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

तुम्हीही बघा गांधींनी ट्विट केलेला हा व्हिडिओ…

मेरी मीडिया छवि का असली सच क्या है? https://t.co/PW4ZZqIN8b pic.twitter.com/IX9Lp91FgE

— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 4, 2022

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 163
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.